Famous Actress Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्रीचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actress Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या 82 वर्षी निधन झाले. अभिनेत्रीच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.

Shreya Maskar

ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

वयाच्या ८२ वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारी ज्येष्ठ अभिनेत्री शेली फॅबेरेस (Shelley Fabares) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या कारकीर्दीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेत्री शेली फॅबेरेस यांनी वयाच्या ८२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'द डोना रीड शो' मधील किशोरवयीन भूमिकेपासून ते 'वन डे ॲट अ टाइम' आणि 'कोच' सारख्या मालिकांपर्यंत अनेक दशके शेली फॅबेरेस या टेलिव्हिजनवर सक्रिय राहिल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री शेली फॅबेरेस यांचे शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले, असे तिच्या कुटुंबाने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर श्रद्धांजली वाहिली आहे.

शेली फॅबेरेस यांच्या करिअरचा प्रवास

शेली फॅबेरेस यांचा जन्म १९४४ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे झाला आणि त्यांनी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या १० व्या वर्षी 'द लोरेटा यंग शो' मध्ये काम करून त्यांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. 'प्रोड्युसर्स शोकेस'च्या 'अवर टाउन' या निर्मितीमध्ये त्यांनी पॉल न्यूमन, फ्रँक सिनात्रा आणि इव्हा मेरी सेंट यांच्यासोबत काम केले. तसेच रोझलिंड रसेल यांच्या 'द गर्ल रश' या चित्रपटात आणि रॉक हडसन यांच्या 'नेव्हर से गुडबाय' या नाट्यात्मक चित्रपटातही त्या झळकल्या.

अभिनेत्रीच्या सुरुवातीच्या इतर कामांमध्ये 'अॅनेट', 'कॅप्टन मिडनाईट' आणि 'द ट्वायलाइट झोन' मधील 'ब्लॅक लेदर जॅकेट्स' या भागाचा समावेश आहे. त्यांना सर्वात मोठी संधी 'द डोना रीड शो'मध्ये 'मेरी स्टोन'ची भूमिका मिळाल्यावर मिळाली; १९५८ ते १९६३ या काळात त्या या शोचा नियमित भाग होत्या. याच काळात त्यांना रेकॉर्डिंगचा करारही मिळाला आणि 'जॉनी एंजेल' सह त्यांची दोन गाणी 'टॉप ४०' हिट्सच्या यादीत समाविष्ट झाली. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांनी एल्विस प्रेस्ली यांच्यासोबत 'गर्ल हॅपी', 'स्पिनआउट' आणि 'क्लॅमबेक' या तीन चित्रपटांमध्ये सह-कलाकार म्हणून काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike : दिवाळीत साखर 100 पार...? ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा महागणार!

३० दिवस रोज जवस खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या जवसाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: लोणी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणं उगवलंच नाही

९० कोटींच्या घोटाळ्यात मंत्री अडकला, सीबीआयचा थेट राज्यपालांकडे अर्ज, राजकारणात खळबळ

Pune : पुण्यात भयंकर दुर्घटना! तरूणी धावत्या PMPML बसमधून पडली, मागून येणाऱ्या स्कुल बसने चिरडले

SCROLL FOR NEXT