Mumbai : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; सागर माळीचे ३८व्या वर्षी निधन

Mumbai News : मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध बॉडी बिल्डर सागर माळी यांचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले. किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर डायलेसिस सुरू होते.
Mumbai Bodybuilder Sagar Mali Dies News
Mumbai Bodybuilder Sagar Mali Dies NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईचे प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखले जाणारे सागर माळी यांचे निधन

  • दोन्ही किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती

  • गेल्या दोन वर्षांपासून गंभीर किडनीच्या आजाराशी झुंज देत होते

  • २०१३ मध्ये त्यांनी ‘मुंबई श्री’ किताब पटकावला होता

बॉडी बिल्डिंग क्षेत्रातून दु:खद बातमी समोर आली आहे. मुंबईचा‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डिंगपटू सागर माळी याचे वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून तो किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर त्याच्यावर डायलेसिस सुरू होते. अखेर रविवारी सकाळी त्याची ही झुंज संपली.

सागर माळीने २०१३ मध्ये ‘मुंबई श्री’ किताब पटकावत बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याची धिप्पाड शरीरयष्टी आणि स्नायूंची ठेवण पाहता त्याच्यात जगप्रसिद्ध बॉडी बिल्डिंग पटू रॉनी कोलमनची झलक दिसत होती. त्यामुळे त्याला ‘रॉनी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे हेच टोपणनाव त्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाले.

Mumbai Bodybuilder Sagar Mali Dies News
Monsoon Tips : पावसाळ्यात तांदळामध्ये पडतायत किडे? 'या' ट्रिक्स करा फॉलो, मिनिटात होतील गायब

मुंबई श्रीनंतर सागरने महाराष्ट्र श्री आणि भारत श्री या स्पर्धांमध्येही दमदार कामगिरी केली. २०१४ मध्ये मुंबईत झालेल्या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात त्याने चौथे स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली क्षमता सिद्ध केली. २०१६ मध्ये महाराष्ट्र श्रीचा किताब त्याच्याकडून थोडक्यात हुकला. २०२० मध्येही महाराष्ट्र श्री स्पर्धेत त्याने सुनीत जाधवला कडवी टक्कर दिली होती. विशेष म्हणजे सागरचा बॉडी बिल्डिंगचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. सुरुवातीच्या काळात तो घरोघरी वर्तमानपत्रे वाटायचा. त्याच वर्तमानपत्रांमध्ये छापून येणारे बॉडी बिल्डिंगचे फोटो आणि बातम्या पाहून त्याला या क्षेत्राची आवड निर्माण झाली.

Mumbai Bodybuilder Sagar Mali Dies News
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

वयाच्या विशीत त्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मेहनतीच्या जोरावर काही वर्षांत त्याचेच फोटो वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर झळकू लागले. कोरोनानंतर सागरने बॉडी बिल्डिंग क्षेत्रापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढे त्याची ही विश्रांती कायमची ठरली. गेल्या दोन वर्षांपासून तो किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होता. सागरच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. कुटुंबीय परदेशात असल्याने त्याच्यावर रविवारी मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक गुणी आणि मेहनती खेळाडू काळाच्या पडद्याआड गेल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com