१८ वर्षीय अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू झाला. 'गॉडझिला व्हर्सेस काँग' आणि 'गॉडझिला x काँग: द न्यू एम्पायर' या चित्रपटांमधील 'जिया'च्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केली हॉटल (Kaylee Hottle) हिचा मृत्यू झाला आहे. वयाच्या १८ वर्षा अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी (२१ जुलै) रोजी मेरीलँडमधील फ्रेडरिक येथे झालेल्या कार अपघातात हॉटलचा मृत्यू झाला. तिचे वडील, जोशुआ हॉटल यांनी 'अमेरिकन साइन लँग्वेज'द्वारे फेसबुक लाइव्हवर ही बातमी दिली. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला रुग्णालयात नेण्यापूर्वी घटनास्थळीच आपत्कालीन पथकाने तिच्यावर उपचार केले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच तिचे हृदय बंद पडले आणि डॉक्टरांना तिला वाचवण्यात अपयश आले. अपघाताच्या नेमक्या परिस्थितीबद्दल प्रशासनाने अद्याप अधिक तपशील जाहीर केलेले नाहीत.
'टेक्सास स्कूल फॉर द डेफ' यांनी देखील आपल्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. केली हॉटलच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर श्रद्धांजली वाहिली आहे.
केली हॉटलला २०२१ मधील 'गॉडझिला व्हर्सेस काँग' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये मोठी ओळख मिळाली. यात तिने 'जिया' ही भूमिका साकारली होती. जिया ही एक कर्णबधिर अनाथ मुलगी असते. केली हॉटलने २०२४ मधील 'गॉडझिला x काँग: द न्यू एम्पायर' मध्येही हीच भूमिका पुन्हा साकारली आणि प्रेक्षकांकडून तिला मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली. तिच्या या अभिनयासाठी तिला 'सॅटर्न अवॉर्ड'मध्ये 'सर्वोत्कृष्ट युवा कलाकार' म्हणून नामांकनही मिळाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.