तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात भीषण कार अपघात झाला.
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.
एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तेलंगणा राज्यातील परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृ्त्यू झालाय. बाईकस्वाराचा जीव वाचवण्याच्या नादात कारचा अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय.तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. मौलाना मोहम्मद नदीन, त्याची आई शमीमा बेगम आणि चार वर्षाची मुलगी अनाबिया तस्कीन अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना मोहम्मद नदीम हे अरबी शिक्षक आहेत. ते नांदेड शहरातील बागबान कॉलनी मस्जिद कुबा गल्ली येथे आपल्या कुटुंबियांसह राहत होते. दरम्यान कुटुंबातील काही सदस्य उमराह रात्रेला गेले होते. यात्रा करून आज त्यांचे हैदराबाद येथे आगमन होणार होते. त्यांना आणण्यासाठी मौलाना मोहम्मद नदीम आई, मुलगी आणि भावांना घेऊन नांदेडहून कारने हैदराबादला रवाना झाले होते.
सांगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात त्यांचा अपघात झाला. अचानक एक दुचाकीस्वार कारसमोर आला होता. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्यांनी अचानक ब्रेक मारला. परंतु कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानंतर कार तीनवेळा उलटली आणि दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात आई, मुलगा आणि नात या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमध्ये असलेला काही जण गंभीर जखमी आहेत.
या जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तेलंगणातील संगारेड्डी येथे आज पहाटे ही घटना घडली होती. माय लेकासह नातीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.