

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा अपघात
पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी जाताना घडली घटना
जामखेड येथे भाजप आमदारांच्या कारला अपघात
अपघातामध्ये तिघे जण जखमी
भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे जाताना ही अपघाताची घटना घडली. कारमधून तिघे जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. या सर्वांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनाला जाताना ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला मोठा अपघात झाला. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही अपघाताची घटना घडली. आमदार नारायण कुचे हे पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी जात होते. पण वाटेतच त्यांच्या कारला अपघात झाला. अपघाताची ही घटना पहाटे ४ वाजून ४० मिनिटाला जामखेड या ठिकाणी झाला.
कारमध्ये आमदार कुचे यांच्यासह चौघे जण होते. पण काही कामानिमित्त आमदार कारमधून खाली उतरले आणि त्यांचा चालक आणि बॉडीगार्ड हे एका व्यक्तीला आणण्यासाठी पुढे निघून गेले. तिथून परत येत असताना ही अपघाताची घटना घडली. वाटेत अचानक कुत्रा आडवा. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघातामध्ये आमदार कुचे यांच्या कारचा चालक आणि बॉडीगार्ड गंभीर जखमी झाले. तर आणखी एक जण किरकोळ जखमी झाल. जखमींना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातावेळी आमदार कुचे कारमध्ये नव्हते त्यामुळ ते बचावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.