Heart disease: शरीरात अचानक ही ५ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय धोक्यात आहे

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक अचानक येतो असे अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात शरीर आधीच काही महत्त्वाचे इशारे देत असतं. ही लक्षणं वेळेत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर धोका टाळता येऊ शकतो.

heart attack symptoms | saam tv

धोका कशाने वाढतो?

चुकीची जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे हार्ट अटॅक वाढतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

heart disease | saam tv

छातीत दुखणं

छातीत जडपणा, दाब, आवळल्यासारखं वाटणं किंवा जळजळ होणं हे हृदयाशी संबंधित समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. विशेषतः चालताना जिने चढताना किंवा शारीरिक श्रम करताना ही अस्वस्थता वाढत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहावं.

cardiovascular health | saam tv

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं

दैनंदिन साधी कामं करतानाही अचानक खूप थकवा जाणवत असेल तर तो सामान्य थकवा नाही. हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते.

warning signs | saam tv

श्वास घेण्यास त्रास होणं

चालताना, जिने चढताना किंवा अगदी विश्रांती घेतानाही श्वास लागणं हे हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. काही लोकांना झोपताना सरळ झोपल्यावरही श्वास घेण्यास त्रास होतो.

leg swelling | saam tv

पाय, घोटे किंवा हातांना सूज

हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचू लागतो आणि त्यामुळे पाय, घोटे, पोटऱ्या किंवा हातांना सूज येऊ शकते. ही सूज सामान्य कारणांमुळेही येऊ शकते, मात्र ती वारंवार होत असेल तर हृदयाच्या कार्यक्षमतेची तपासणी आवश्यक असतं.

ankle swelling | saam tv

चक्कर येणं

अचानक चक्कर येणं, डोके हलकं वाटणं किंवा कोणतंही कारण नसताना थंड घाम येणं ही हृदयाशी संबंधित गंभीर समस्या दर्शवणारी लक्षणं असू शकतात. अशा वेळी उशीर न करता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

dizziness | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

left arm pain heart attack | saam tv
येथे क्लिक करा