Pushpa 3 Update: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 3: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 3' मध्ये विजय देवरकोंडा की नानी ? दिग्दर्शक सुकुमारच्या उत्तराने चाहत्यांना ४४० व्होल्टचा झटका

Pushpa 3 Update: 'पुष्पा २' च्या जबरदस्त यशानंतर आता सर्वांना 'पुष्पा ३' ची उत्सुकता आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या या फ्रँचायझीत विजय देवरकोंडा किंवा नानी यांपैकी एका कलाकाराची एन्ट्री होऊ शकते.

Shruti Vilas Kadam

Pushpa 3: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. ‘पुष्पा: द राईज’ आणि ‘पुष्पा: द रुल’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. ‘पुष्पा 2’ ने जागतिक स्तरावर 1800 कोटींपेक्षा जास्त कमाई करून नवा विक्रम केला. यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा किंवा नानी यांची एंट्री होणार का? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अलीकडेच चेन्नईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक सुकुमार यांना याबाबत विचारण्यात आले. त्यांनी या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, “2025 मधील सुकुमारलाही याबद्दल माहिती नाही, पण 2026 मधील सुकुमार कदाचित या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.” त्यांच्या या वक्तव्यावरून असे दिसते की विजय देवरकोंडा किंवा नानी यांचापैकी ‘पुष्पा 3’ मध्ये कोण दिसणार हे अजून ठरले नाही.

‘पुष्पा 3’ च्या तयारीबाबत विचारले असता निर्माते वाय. रवी शंकर यांनी सांगितले की, अल्लू अर्जुन सध्या दिग्दर्शक एटली आणि त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. हे चित्रपट पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ‘पुष्पा 3’ च्या शूटिंगला आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.

पुष्पा 3’ मध्ये आणखी कोणते नवीन चेहरे असतील, चित्रपटाची कथा कोणत्या वळणावर जाईल, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की हा चित्रपट भव्यदिव्य असेल आणि प्रेक्षकांना अद्भुत अनुभव देईल. त्यामुळे ‘पुष्पा 3’ साठी चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार हे नक्की आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT