Ashi Hi Jamva Jamvi: प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते; अशोक मामांच्या 'अशी ही जमवा जमवी'चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित!

Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie: लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सिनेमात दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie
Ashi Hi Jamva Jamvi Marathi MovieSaam Tv
Published On

Ashi Hi Jamva Jamvi: प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

ट्रेलर मध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोघांची कमाल जुगलबंदी पहायला मिळते. सिनेमातील कथा जरा हटके आहे त्यामुळे सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर खास ठरतोय. ट्रेलर पाहून अंदाज येतो की मनोरंजना बरोबरच हा एक कौटुंबिक चित्रपट सुद्धा आहे. नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केला गेलाय.

Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie
kunal kamra: 'एखाद्या कलाकाराची...' कुणाल कामराने पुन्हा साधला सरकारवर निशाणा; लोकशाहीचा उल्लेख करत म्हणाला...

खट्याळ, गोंडस, हळवी अशी चित्रपटाची कथा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांसोबत सिनेमात ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील संभ्रम, विश्वास, निरागसता, घालमेल अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील.

Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie
Devmanus: 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला; 'देवमाणूस' चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत प्रदर्शित

कथा नक्की काय आहे आणि ती कोणत्या वळणावर जाणार? अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पकडले जातील का? जमवा जमवी कशा प्रकारे होणार आहे हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव, राहुल शांताराम यांनी मनोरंजन विश्वात सिनेप्रेमींसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते यांनी केलं आहे. 'अशी ही जमवा जमवी' हा सिनेमा १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com