Sikandar: सिकंदरच्या शोदरम्यान थिएटरमध्येच फटाके फोडले; सलमान खानच्या फॅन्सचा धुडगूस

Salman Khan Sikandar : ‘सिकंदर’ चित्रपटामधील सलमान खानच्या एंट्रीच्या वेळी चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका थिएटरमध्ये घडला आहे.
Sikander
Sikander saam Tv
Published On

Sikandar: बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा ‘सिकंदर’ ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काही चाहत्यांनी अतिरेकी जल्लोष करत थिएटरमध्येच फटाके फोडल्याने गोंधळ उडाला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका थिएटरमध्ये घडली. ‘सिकंदर’ चित्रपटामध्ये सलमानच्या एंट्रीच्या वेळी चाहत्यांनी फटाके फोडल्याने थिएटरमध्ये मोठी खळबळ माजली. या घटनेमुळे प्रेक्षकांना घाबरून बाहेर पडावे लागले.

फॅन्सचा धुडगूस

सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडिओ मालेगाव फॅन क्लब नावाच्या ट्विटर अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही प्रेक्षक फटाके फोडताना तर काहीजण भीतीने धावताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ‘जोहरा जबीन’ हे गाणे लागल्यानंतर प्रेक्षक नाचू लागले. थिएटरमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असल्याने ही घटना अधिक गंभीर वाटत आहे. फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका वाढला होता, त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

Sikander
Kesari Chapter 2: १६५० गोळ्या, १० मिनिटे आणि १ माणूस…; अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर २' चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

चिंतेचा विषय

याआधीही सलमान खानच्या ‘टायगर ३’ प्रदर्शनावेळी अशाच प्रकारे थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले होते. त्यावेळी सलमान खानने चाहत्यांना आवाहन करत कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले होते. मात्र, असे प्रकार पुन्हा होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

Sikander
Namrata Sambherao: 'मेरी आँखों में मत झांको...' लॉली किती मानधन घेते तुम्हाला माहिती आहे का?

सिकंदर बॉक्स ऑफिस कलेक्शन

ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' या चित्रपटात सलमान खानचा अ‍ॅक्शन अवतार पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, प्रतीक पाटील, काजल अग्रवाल आणि सत्यराज यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित 'सिकंदर' या चित्रपटाने तीन दिवसात 74.5 कोटी रूपये कमावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com