Kesari Chapter 2: १६५० गोळ्या, १० मिनिटे आणि १ माणूस…; अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर २' चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

Kesari Chapter 2 Trailer: अक्षय कुमार आणि अनन्या पांडे यांच्या आगामी 'केसरी चॅप्टर २' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. डोळ्यात पाणी आणणारा 'केसरी चॅप्टर २' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
Kesari Chapter 2 Trailer
Kesari Chapter 2 TrailerSaam Tv
Published On

Kesari Chapter 2 Trailer: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार एप्रिलमध्ये दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता विष्णू मंचूच्या 'कन्नप्पा' चित्रपटात दिसण्यापूर्वी, अक्षय कुमार 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. अलीकडेच, अक्षयने त्याच्या चित्रपटाचा टीझर शेअर केला जो चाहत्यांना खूप आवडला. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे.

केसरी चॅप्टर २ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आता निर्मात्यांनी त्याच्या ट्रेलरची रिलीज तारीख जाहीर केली आहे. स्वतः अक्षयनेही ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. केसरी चॅप्टर २ चा ट्रेलर चाहत्यांचे मन हेलावून टाकणारा असणार आहे. कारण या चित्रपटाचा टीझरच अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणण्याचे काम करतो.

Kesari Chapter 2 Trailer
Devmanus: 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला; 'देवमाणूस' चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत प्रदर्शित

'केसरी चॅप्टर २' चा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल?

अक्षय कुमारने चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सोशल मीडियावर एक मोठी अपडेट दिली आहे. त्याचा ट्रेलर ३ एप्रिल रोजी म्हणजे उद्या लाँच होणार आहे. एक पोस्ट शेअर करताना त्यांने लिहिले, "१६५० गोळ्या, १० मिनिटे आणि या सगळ्याविरुद्ध गर्जना करणारा १ माणूस. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार व्हा. केसरी चॅप्टर २ चा ट्रेलर उद्या येईल."

Kesari Chapter 2 Trailer
kunal kamra: 'एखाद्या कलाकाराची...' कुणाल कामराने पुन्हा साधला सरकारवर निशाणा; लोकशाहीचा उल्लेख करत म्हणाला...

'केसरी चॅप्टर २' कधी प्रदर्शित होईल?

'केसरी चॅप्टर २' हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या सुपरहिट चित्रपट 'केसरी'चा सिक्वेल आहे. याचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे. हा चित्रपट १९१९ च्या जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. यामध्ये अक्षय दिवंगत वकील सी शंकरन नायर यांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. अभिनेत्री अनन्या पांडे दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आर माधवन नेव्हिल मॅकिन्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com