Akshay Kumar  saam tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : लाल परी लाल परी...; बॉलिवूडच्या 'खिलाडी'चा हाय हिल्स घालून भन्नाट डान्स, अक्षय कुमार पडता पडता वाचला, VIDEO व्हायरल

Akshay Kumar Dance In Heels : अक्षय कुमारने हाय हिल्स घालून भन्नाट डान्स केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'व्हील ऑफ फॉर्च्यून' या गेम शोच्या अंतिम सोहळा पार पडला.

अक्षय कुमारने हाय हिल्स घालून भन्नाट डान्स केला.

अक्षय 'लाल परी' या गाण्यावर हिल्स घालून थिरकला.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा 'भूत बंगला' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. तसेच नुकताच अक्षय कुमार होस्ट करत असलेल्या 'व्हील ऑफ फॉर्च्यून' या गेम शोचा महाअंतिम सोहळा थाटामाटात पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या शोमध्ये भूमी पेडणेकर, जॅकलिन फर्नांडिस आणि चित्रपट निर्माती फराह खान हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

'व्हील ऑफ फॉर्च्यून'च्या ग्रँड फिनालेला अक्षय कुमारला अनोखा अंदाज पाहायला मिळाला. खिलाडीने चक्क हाय हील्स घालून भन्नाट डान्स केला. अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात जॅकलीन फर्नांडिसने अक्षय कुमारला हील्स घालून नाचण्याचे चॅलेंज दिले. अक्षय कुमारला लाल रंगाच्या हाय हील्स देण्यात आल्या आणि त्याला नाचायला सांगितले. अक्षय कुमार म्हणाला की, "त्याने यापूर्वी कधीही हील्स घातल्या नव्हत्या." तेव्हा फराह खान म्हणाली की, "तू इतके धोकादायक स्टंट केले आहेत, त्यामुळे तो हे देखील करू शकतो."

जॅकलीनने दिलेले चॅलेंज अक्षय कुमार स्वीकारतो आणि हाय हिल्स घालून 'हाऊसफुल ४' मधील 'लाल परी' या गाण्यावर जबरदस्त नाचतो. त्याचा आत्मविश्वास अप्रतिम होता. फराह खान आणि जॅकलिनने देखील अक्षय कुमारसोबत डान्स केला. नाचताना अक्षय कुमार क्षणभर अडखळला, पण अभिनेत्याने स्वतःला सावरले आणि डान्स केला. अक्षय कुमारचा डान्स पाहून सर्व प्रेक्षक उत्साहाने टाळ्या वाजवताना दिसले. फराहने अक्षयच्या धैर्याचे कौतुक केले.

अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याच्या डान्स आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्यून' हा शो ६५ भाग पूर्ण करून २७ एप्रिल रोजी संपला. अंतिम भागात तो अभिनेता भावुक झालेला दिसला. आता 26 जून 2026 ला अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' चित्रपट रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: ‘या’ ४ राशींच्या नशिबात मोठा बदल; धनलाभासह मिळणार खास संधी!

Mumbai Crime : अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला, अन् पैशांसाठी चोर झाला; सीसीटीव्हीने बिंग फुटले

डायबिटीज असणाऱ्यांनी सफरचंद खावे की टाळावे?

Maharashtra News Live Update: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

मोठी बातमी! धार्मिक सण-उत्सवात फटाके फोडण्यास बंदी; उच्च न्यायालयाचा आदेश

SCROLL FOR NEXT