Shreya Maskar
'महाराष्ट्राची अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अवतार पाहून चाहते वेडे झाले आहेत.
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्राम वेस्टन लूकचे फोटो शेअर केले आहे.
सोनालीने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान करून भन्नाट फोटोशूट केले आहे.
ग्लॉसी मेकअप, मॅचिंग ज्वेलरी आणि सुंदर हेअरस्टाइल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
फोटोंमध्ये सोनाली हटके पोज देताना दिसत आहे. तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने झाले आहेत.
सोनाली कुलकर्णी 'परिणती - बदल स्वतःसाठी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
'परिणती'चित्रपटाची कथा सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याभोवती फिरताना पाहायला मिळत आहे.