Akshay Kumar : ₹७५००० साठी अक्षय कुमार चक्क प्रोड्युसरच्या घरातील सामान गेला घेऊन, खिलाडीचा 'तो' अतरंगी किस्सा वाचाच

Bollywood Actor Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. खिलाडाचा एक अतरंगी किस्सा वाचा.
Bollywood Actor Akshay Kumar
Akshay KumarSAAM TV
Published On
Summary

अक्षय कुमारचा नुकताच 'भूत बंगला' चित्रपट रिलीज झाला.

एकेकाळी प्रोड्युसरने अक्षय कुमारचे पैसे रखडवले होते.

अभिनेत्याने निर्मात्याच्या घरातून त्याचे सामान उचलले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजत आहे. अक्षय कुमार अलिकडे एकावर एक सुपरहिट चित्रपट देताना दिसत आहे. अक्षय कुमारला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. करिअरच्या सुरूवातीला अक्षय कुमारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीमध्ये अक्षयचा कोणी गॉडफादर नव्हता. सर्व आव्हानांवर मात करून अक्षय कुमार आज बॉलिवूडमधील सुपरस्टार बनला आहे.

अक्षय कुमारच्या सुरुवातीच्या कारकि‍र्दीत अनेकदा अशी परिस्थिती होती की, निर्माते त्याचे पैसे रोखून ठेवत होते. असाच एक किस्सा अक्षय कुमारने एका मिडिया मुलाखतीत सांगितला होता. अक्षय कुमार निर्मात्यांकडून रखडलेले स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी कोणत्या थराला गेला, जाणून घ्या. अक्षय कुमारने थेट एका निर्मात्याच्या घरातील वस्तू ७५,००० रूपयांना चोरल्या होत्या.

अक्षय कुमारने निर्मात्याच्या घरातील वस्तू चोरल्या

अभिनेता अक्षय कुमारने सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भूमिका साकारल्या. बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने अनेक कमी बजेटच्या चित्रपटांमध्येही काम केले. या चित्रपटांचे निर्माते अनेकदा कलाकारांचे मानधन रोखून ठेवत असत, ज्यामुळे त्याला आपले मानधन परत मिळवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापराव्या लागल्या. एकदा, जेव्हा एका निर्मात्याने अक्षय कुमारला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा अभिनेत्याने त्याच्या घरात घुसून त्याच्या वस्तू चोरल्या. ही गोष्ट अक्षय कुमारने स्वतः एका शोमध्ये उघड केली.

अभिनेत्याने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितल्याप्रमाणे, अक्षय कुमार आपले पैसे मिळवण्यासाठी निर्मात्यांशी वेगवेगळ्या प्रकारे खोटे बोलायचा. एक निर्माता होता ज्याला अक्षय कुमारने समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याची कोणतीही सबब चालली नाही. निर्मात्याला अक्षय कुमारचे ७५,००० रुपये देणे बाकी होते. त्यातील काही पैसे निर्मात्याने अक्षयला दिले होते पण काही रक्कम बाकी होती. मात्र जेव्हा निर्मात्याने अक्षयला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा अक्षयने त्याच्या घरी जायचे ठरवले.

अक्षय कुमार एका सकाळी लवकर निर्मात्याच्या घरी पोहोचला. दोघेही दारात उभे राहून एकमेकांकडे पाहत होते. अक्षय म्हणाला, "मी आत गेलो आणि जेव्हा हॉलमध्ये पोहोचलो, तेव्हा मला तिथे एक रेकॉर्डर दिसला. मला माहित नाही माझ्या मनात काय आलं आणि मी तो उचलला. यानंतर, मी निर्मात्याच्या घरातून एक ज्युसरसुद्धा घेतला. त्यानंतर या सर्व वस्तूंना विकून अक्षयने पैसे मिळवले. "

Bollywood Actor Akshay Kumar
"माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत...", बॉलिवूडची प्रसिद्ध Actress असं का म्हणाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com