नाद फक्त 'यामाहा'चा! मौजमजा, नशेसाठी पुण्याच्या तरुणांनी चोरल्या दुचाकी

Pune Youth Stealing Yamaha Bikes For Drugs And Fun: पुण्यातील दोन तरुणांना १० दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी फक्त यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी करत होते.
Two accused arrested by Pune Crime Branch for allegedly stealing 10 Yamaha motorcycles for fun and drug use
Two accused arrested by Pune Crime Branch for allegedly stealing 10 Yamaha motorcycles for fun and drug useSaam Tv
Published On
Summary

पुण्यात दोन तरुणांना १० दुचाकी चोरीप्रकरणी अटक

आरोपी फक्त यामाहा कंपनीच्या गाड्यांवर ठेवत होते लक्ष

मौजमजा आणि नशेसाठी चोरी केल्याची कबुली

१० चोरीच्या दुचाकी जप्त; आणखी दोन आरोपी फरार

हडपसर, दिघी, चंदननगर पोलिस ठाण्यात आधीचे गुन्हे नोंद

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १० चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या १० पैकी काही गाड्या यामाहा कंपनीच्या आहेत. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता त्या दोघांसोबत आणखी दोघं जणं मिळून फक्त यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी करत असल्याची कबुली दिली. यामाहा कंपनीच्या दुचाकी आता बाजारात मिळत नसल्याने ते हडपसर, चंदननगर भागात यामाहा कंपनीच्या दुचाकींवर लक्ष ठेवून त्या चोरी करत असे. तसेच यातील काही तरुण या दुचाकींचा वापर नशा करायला जाण्यासाठी सुद्धा वापरत होते.

Two accused arrested by Pune Crime Branch for allegedly stealing 10 Yamaha motorcycles for fun and drug use
Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुखकर! कुठे सुरू होणार नवी मेट्रो?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना २ तरुण एका दुचाकीवर बसले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचं दिसून आल्यावर त्यांनी या तरुणांकडे चौकशी केली ती दुचाकी चोरीचे असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा सगळा प्रकार पुढे आला

Two accused arrested by Pune Crime Branch for allegedly stealing 10 Yamaha motorcycles for fun and drug use
JEE Mains Result: डोबिंवलीचा लेक राज्यात पहिला, जेईईमध्ये ९९.९९ टक्के मिळवले

पवन तानाजी माने (वय २२) आणि प्रतिक शिवाजी अस्वरे (वय २०) असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी आणखी २ जणांचा शोध सुरू आहे. हडपसर, दिघी, चंदननगर पोलिस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात याआधी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com