House Arrest Show Deleted Saam Tv
मनोरंजन बातम्या

House Arrest: अश्लिलतेचा कळस; महिलांना कपडे काढायला लावले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाऊस अरेस्टचे सर्व एपिसोड डिलिट

House Arrest Show Deleted : बिग बॉस फेम एजाज खानच्या वादग्रस्त शो 'हाऊस अरेस्ट'मधील अश्लील कंटेंटवरून गदारोळ सुरू आहे. शोच्या काही अश्लील क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

Shruti Vilas Kadam

House Arrest Show: बिग बॉस फेम एजाज खानच्या वादग्रस्त शो 'हाऊस अरेस्ट'मधील अश्लील कंटेंटवरून गदारोळ सुरू आहे. शोच्या काही अश्लील क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. व्हिडिओंमध्ये महिला स्पर्धक त्यांचे कपडे काढताना दिसत होत्या. एका व्हिडिओमध्ये, स्पर्धकांना काही विचित्र पोझ देण्यास सांगण्यात आले. शोच्या या अश्लील क्लिप्स पाहिल्यानंतर त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण आता उल्लू ओटीटी प्लॅटफॉर्मने सगळे एपिसोड डिलीट केले आहेत.

उल्लू ओटीटी प्लॅटफॉर्मने सर्व एपिसोड काढून टाकले

आता या शोवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उल्लू ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 'हाऊस अरेस्ट' शोचे सर्व भाग काढून टाकण्यात आले आहेत. शोमधील बोल्ड आणि वादग्रस्त कंटेंटमुळे, ओटीटी प्लॅटफॉर्मने तो त्यांच्या अधिकृत साइटवरून काढून टाकला आहे. वृत्तानुसार, एजाज खानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गट नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजप नेत्या चित्र वाघ यांनी देखील या शोवर टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एजाज खान आणि निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले

दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना समन्स पाठवले आहेत. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लू अॅपवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे. समन्सनुसार, २९ एप्रिल २०२५ रोजी शोची एक छोटी क्लिप व्हायरल झाली. यामध्ये एजाज खान महिला स्पर्धकांना कॅमेऱ्यासमोर खाजगी पोझ देण्यास सांगताना दिसला.

'हाऊस अरेस्ट' शोचे स्पर्धक कोण आहेत?

'हाऊस अरेस्ट' हा शो बिग बॉस आणि लॉकअपच्या आधारे डिझाइन करण्यात आला होता. हा एक धाडसी आणि सेन्सॉर नसलेला रिअॅलिटी शो असल्याचे सांगण्यात आले. गेहना वशिष्ठ, नेहल वडोदिया आणि आभा पॉल या बोल्ड अभिनेत्रींव्यतिरिक्त, हुमेरा शेख, सारिका साळुंके, मुस्कान अग्रवाल, रितू राय, आयुषी भौमिक, सिमरन कौर, जोनिता डिक्रूझ आणि नैना छाब्रा या शोचा भाग होत्या. पुरुष स्पर्धकांमध्ये राहुल भोज, संकल्प सोनी आणि अक्षय उपाध्याय या नवोदितांना शोबिझमध्ये प्रवेश मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT