Raid 2 Advance Booking Collection: एप्रिलमध्ये चित्रपटप्रेमींसाठी अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहे. तरीही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सनी देओल, अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी सारख्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले, पण कोणीही २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करू शकले नाही. आता सर्वांच्या नजरा मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'रेड २'वर लागल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट 'रेड 2' १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून रिपोर्ट्सनुसार, 'रेड 2' ने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीनुसार, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या चित्रपटांमध्ये तिकिटांची मागणी प्रचंड आहे. अनेक थिएटरमध्ये पहिल्या दिवशीचे शो हाऊसफुल झाले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट्सच्या मते, 'रेड 2' चा ओपनिंग डे कलेक्शन १५ कोटींपर्यंत जाऊ शकतो.
'रेड 2' हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रितेश देशमुख आणि वाणी कपूर महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते आणि त्यामुळेच दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.