Paresh Rawal On marathi Natak sangeet devbabhali
Paresh Rawal On marathi Natak sangeet devbabhaliSaam Tv

Paresh Rawal: 'संगीत देवबाभळी' सारखे नाटक समाजातील खोल प्रश्नांवर...; परेश रावल यांना मराठी रंगभूमीचं मोठं कौतुक, म्हणाले...

Paresh Rawal On marathi Natak: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मराठी नाटक 'संगीत देवबाभळी'चे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी या मुलाखतीत 'संगीत देवबाभळी' नाटकाचे सुंदर वर्णन केले आहे.
Published on

Paresh Rawal On marathi Natak: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मराठी नाटक ' संगीत देवबाभळी'चे भरभरून कौतुक केले आहे. 'देवबाभळी' या नाटकाने त्यांच्यावर खोल प्रभाव टाकला असून, त्यांनी विशेषतः या नाटकाचा विषय, लेखन आणि कलाकारांच्या अभिनयाची मनापासून प्रशंसा केली आहे. परेश रावल यांनी सांगितले की, "देवबाभळी"सारखे नाटक केवळ मनोरंजन करत नाही, तर समाजातील खोल प्रश्नांवर विचार करायला भाग पाडते.

'संगीत देवबाभळी' हे नाटक ग्रामीण जीवनातील वास्तव, तिथल्या रूढी, प्रथा आणि मानवी भावभावनांचे अत्यंत प्रभावी चित्रण करते. परेश रावल यांनी या नाटकाच्या मांडणीबद्दल सांगितले की, "मराठीतली अशी नाटकं पाहिली की वाटतं, रंगभूमीचा खरा आत्मा अजूनही जिवंत आहे." त्यांनी नाटकातील प्रत्येक पात्राचे सखोलतेने केलेले सादरीकरण आणि कथानकाची सहज गुंफण याचेही विशेष कौतुक केले.

Paresh Rawal On marathi Natak sangeet devbabhali
Virat and Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार? 'या' जवळच्या व्यक्तीने सांगितले सत्य

परेश रावल यांचा असा विश्वास आहे की 'देवबाभळी'सारखी नाटके केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाहीत, तर त्यांना अंतर्मुख करतात आणि समाजात परिवर्तन घडवण्याची ताकदही राखून असतात. ते म्हणाले की, "आजच्या काळात जिथे केवळ चमक-धमक पाहिली जाते, तिथे 'देवबाभळी'सारखे नाटक वास्तवाशी आपली नाळ जोडून ठेवते. प्राजक्त देशमुख याचे उत्तम लिखाण आणि या नाटकातील संगीत हे संगीत देवबाभळी या नाटकाचा आत्मा आहे. अशी नाटक आजही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहतात आणि पसंत करतात हे मराठी रंगभूमीचं मोठं यश आहे."

Paresh Rawal On marathi Natak sangeet devbabhali
Atul Kulkarni: दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी काश्मीरच्या पहलगाममध्ये; म्हणाला, 'काश्मिरी लोक फार प्रेमळ आहेत...'

परेश रावल स्वतः एक दिग्गज रंगकर्मी असून, त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवातही थिएटरमधूनच केली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडून मराठी नाटकांचे मिळालेले हे कौतुक विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. सोशल मीडियावरही त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com