Atul Kulkarni: दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी काश्मीरच्या पहलगाममध्ये; म्हणाला, 'काश्मिरी लोक फार प्रेमळ आहेत...'

Atul Kulkarni: काश्मीरच्या पहलगाम परिसरात नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं असताना, मराठमोळा अभिनेते अतुल कुलकर्णीने धाडसी पाऊल उचलत तेथे भेट दिली.
Atul Kulkarni
Atul KulkarniSaam Tv
Published On

Atul Kulkarni: काश्मीरच्या पहलगाम परिसरात नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं असताना, मराठमोळा अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी धाडसी पाऊल उचलत तेथे भेट दिली. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक पर्यटकांनी आपले दौरे रद्द केले आहेत, तर काही जण तातडीने परतले आहेत. मात्र अशा संकटातही अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरला भेट देत स्थानिकांप्रती आपले प्रेम आणि विश्वास दाखवला आहे.

अतुल कुलकर्णी यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून काही फोटो शेअर करत काश्मीरच्या सौंदर्याचं आणि तेथील लोकांच्या आपुलकीचं वर्णन केले. अतुल यांनी स्टोरीला लिहिल, "काश्मीरमधील लोक अत्यंत प्रेमळ, नम्र आणि आदरशील आहेत. इथे आल्यावर मला अजिबात भीती वाटत नाही. उलट इथल्या लोकांनी आम्हाला मनापासून स्वागत केलं." त्यांच्या या विधानाने काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला थोडी सकारात्मक उमेद दिली आहे. तसेच, त्याने पहलगाम लिहलेल्या एका बोर्ड खाली बसलेला एक फोटो पोस्ट करत लिहिले, हिंदोस्तां की ये जागीर है के डर से हिम्मत भारी है हिंदोस्तां की ये जागीर है के नफ़रत प्यार से हारी है चलिए जी कश्मीर चलें सिंधु, झेलम किनार चलें मैं आया हूँ , आप भी आएँ

Atul Kulkarni
Raid 2: 48 कोटींच्या 'रेड 2' साठी अजय देवगणने घेतले बजेटचे अर्धे मानधन; तर रितेश देशमुखला मिळाले इतकेच कोटी रुपये

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं होतं. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने सुरक्षेचे पथक वाढवले असले तरी पर्यटकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीने पहलगामला भेट दिल्याने स्थानिक व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांनीही अतुल कुलकर्णीचे आभार मानले आहेत.

Atul Kulkarni
Elvish Yadav: 'शहीद विनय नरवाल यांची पत्नी...'; पहलगाम हल्ल्यात पतीला गमावणारी हिमांशी एल्विश यादवची मैत्रीण

काश्मीर हे पर्यटनासाठी स्वर्ग समजले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये इथे पर्यटन वाढताना दिसले होते. मात्र अशा घटना काश्मीरच्या प्रतिमेला धक्का लावतात. अशा काळात अतुल कुलकर्णी यांचं धैर्य, काश्मिरी जनतेवर असलेला विश्वास आणि त्यांचं सकारात्मक संदेश देणं, हे एक मोठे पाऊल आहे. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com