बॉलिवूडच्या ब्युटिफूल अभिनेत्रीचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच क्यूट दिसत आहे. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan ) आहे. तिच्या बालपणीच्या फोटोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती कायम आपल्या मुलीसोबत आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) पाहायला मिळते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अलिकडेच 'कान्स'मध्ये देखील दोघी माय-लेक एकत्र दिसल्या. ऐश्वर्या रायचा बालपणीचा फोटो पाहून नेटकरी आराध्या आपल्या आईसारखीच दिसते असे म्हणत आहेत.
लहानपणीच्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय फ्लिक्स हेअरकटमध्ये दिसत आहे. तसेच तिने व्हाइट आणि पिंक रंगाचा क्यूट ड्रेस परिधान केला आहे. कानात रिंग आणि डोक्यावर हेअरबँड लावला आहे. ऐश्वर्या फोटोमध्ये खूपच गोड दिसत आहे. ऐश्वर्याची लेक आराध्याचा देखील लहानपणी असाच काही लूक होता. आराध्याच्या बालपणीच्या फोटोमध्ये देखील तिचा फ्लिक्स हेअरकट आणि डोक्यावर हेअरबँड दिसायचा. आराध्या सेम टू सेम ऐश्वर्याची कॉपी असल्याचे बोले जात आहे.
2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2011मध्ये त्यांना मुलगी झाली. जिचे नाव आराध्या आहे. ऐश्वर्या आणि आराध्याचा बॉन्ड कायम चर्चेत असतो.
ऐश्वर्या रायच्या 'कान्स'मधील लूकने चाहत्यांना वेड लावले. 'कान्स'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायचा देसी अंदाज पाहायला मिळाला. ऐश्वर्या रायने आयव्हरी हँडलूम बनारसी साडी 'कान्स' ला नेसली होती. ऐश्वर्याच्या कपाळावरील 'कुंकू'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐश्वर्यानं कपाळी कुंकू लावून तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.