Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा नवीन चित्रपट; 'या' ॲक्शन हिरोसोबत करणार रोमान्स, सिनेमाचे नाव काय?

Janhvi Kapoor New Movie : जान्हवी कपूर बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोसोबत नवीन चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचे नाव काय, जाणून घेऊयात.
Janhvi Kapoor New Movie
Janhvi KapoorSAAM TV
Published On

बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. सध्या तिचा 'कान्स' लूक खूपच चर्चेत आहे. तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. आता लवकरच जान्हवी कपूर नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूडचा हँडसम हंक हिरो पाहायला मिळणार आहे.

जान्हवी कपूर आता राज मेहता दिग्दर्शित 'लग जा गले' या चित्रपटात झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'लग जा गले' हा चित्रपट ॲक्शन लव्हस्टोरी आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ ( Tiger Shroff ) झळकणार आहे. पहिल्यांदाच जान्हवी कपूर आणि टायगर श्रॉफ ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'लग जा गले' ( Lag Ja gale) हा चित्रपट 2026 च्या अखेरपर्यंत थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो. जान्हवी कपूर लवकरच 'परमसुंदरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पाहायला मिळणार आहे.

जान्हवी कपूर 'कान्स' लूक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'च्या रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली. जान्हवी कपूरने 'कान्स 2025' साठी बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. मोत्यांचे दागिने, केसांचा बन आणि ग्लॉसी मेकअपने जान्हवीचे सौंदर्य खुललं आहे. जान्हवी कपूरचा हा लूक पाहून अभिनेत्री श्रीदेवी आणि त्यांच्या काळाची आठवण झाली आहे. जान्हवी कपूरचा रॉयल ड्रेस कस्टम-मेड स्कर्ट आणि कॉर्सेटचा आहे. जान्हवी कपूरच्या 'कान्स 2025'मधील 'महाराणी' लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Janhvi Kapoor New Movie
Ashok Saraf : "माझे काका...,"; फ्लाइट कॅप्टन भाचीनं विमानात केलं अशोक सराफ यांचं अभिनंदन, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com