Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup : अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचं ब्रेकअप? ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी घेतला मोठा निर्णय

Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराचा सात वर्षानंतर ब्रेकअप झाला आहे.

Chetan Bodke

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल आहे. हे कपल कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अशातच अर्जुन आणि मलायका त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आले आहे. मलायका आणि अर्जुन यांच्यात १२ वर्षांचा फरक असल्यामुळे ह्या कपलला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण असं असलं तरीही इतकी वर्ष त्यांचं नात कधी डगमगलं नाही. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या होत आहे.

मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपचे वृत्त पिंकव्हिलाने दिलेलं आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, या दोघांनीही तब्बल सात वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मलायका आणि अर्जुनने विभक्त होण्याचा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतलेला आहे.

एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुनचे खूप खास नाते होते. विभक्त झाले असले तरी, दोघे कायमच एकमेकांचा आदर करतील. दोघांचं नातं फार काळ टिकलं, पण आता दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या पाच वर्षापासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये, मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. यापूर्वीही अनेकदा मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाच्या चर्चा झालेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. त्यांना अरहान नावाचा मुलगाही आहे. जो मलायकासोबत राहतो. अरबाजने गेल्या काही दिवसांपूर्वी शुरा खानसोबत दुसरं लग्न केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Panchang Today: आज शुक्र प्रदोष व्रताचा संयोग! मिथुनसह चार राशींसाठी लाभदायक दिवस

Shahrukh Khan: चष्मा काढायला लावला, आयडी बघितला...; एयरपोर्टवर किंग खानची झाली चेकिंग, नेमकं कारण काय?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! १२ फेब्रुवारीला मोठा निर्णय होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT