jyoti chandekar death  Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

jyoti chandekar death : प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

स्टार प्रवाह वाहिनीच्या 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेमुळे लोकप्रिया झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेर यांचं पुण्यात निधन झालं. त्यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगा रुग्णालयात उपचार सुरु होते. ज्योती यांची दुपारी ४ च्या सुमारास प्राणज्योत मालवली.

ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

ज्योती चांदेकर या तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वी पुण्याला गेल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती चांदेकर यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.

गेल्या वर्षी त्या मालिकेच्या शुटिंगदरम्यान सेटवर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झालं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकेत परतल्या होत्या.

ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. ५० वर्षांपासून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. त्यांनी 'गुरु' , ढोलकी' 'सलाम', 'पाऊलवाट' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दोन्ही मायलेकींनी 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमातही भूमिका साकारल्या होत्या.

दोघांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.

ज्योती चांदेकर यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतही काम केलं. चांदेकर यांची पूर्णा आजीची भूमिका प्रचंड गाजली. 'त्या तू सौभाग्यवती हो, छत्रीवाला या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

UPS Scheme: १० वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळणार पेन्शन, मासिक वेतनासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक

SCROLL FOR NEXT