Actress Tejaswini Lonari husband Former corporator Samadhan Sarvankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

BMC Election Result: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा मुंबई महापालिका निवडणुकीत दारुण पराभव; ठाकरेंच्या उमेदवाराने चारली धूळ

BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत माहिम प्रभाग १९४ मध्ये शिंदेसेनेला धक्का बसला आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे पती समाधान सरवणकर यांचा निशिकांत शिंदे यांनी पराभव केला आहे.

Shruti Vilas Kadam

BMC Election Result: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये आज दक्षिण मध्य मुंबईतील माहिम परिसरात राजकीय समीकरणे बदलताना दिसली. प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. समाधान सरवणकर हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र असून, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे पती आहेत. या पराभवामुळे माहिमच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या निवडणुकीत समाधान सरवणकर यांचा पराभव करत निशिकांत शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग १९४ हा गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार पराभूत होणे हे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. विशेष म्हणजे, याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनाही मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबालाच पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.

निवडणुकीची लढत अत्यंत चुरशीची ठरली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच निशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, समाधान सरवणकर यांनीही शेवटपर्यंत जोरदार टक्कर दिली. अखेरच्या फेरीपर्यंत निकालाबाबत अनिश्चितता होती. परंतु अंतिम फेरीत मतदारांनी स्पष्ट कौल देत निशिकांत शिंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

या निकालानंतर माहिममध्ये राजकीय सत्तापालट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) साठी हा निकाल धक्कादायक आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, निशिकांत शिंदे यांच्या विजयामुळे विरोधी गटात उत्साहाचे वातावरण आहे. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. यासह शिवसेना शिंदे गटाकडून वॉर्ड क्रमांक 191 मधून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या आणि समाधान सरवणकर यांची बहिण प्रिया गुरव-सरवणकर देखील निवडणुकीच्या रणांगनात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Cucumber Benefits: उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात खा काकडी, आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra Elections Result Live Update: अमरावतीत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने खाते उघडले

अचानक रात्रीच्या वेळेस का ओरडू लागतात कावळे?

Ladli Behna Yojana: लाडकीच्या खात्यात ३२वा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला ₹१५०० आले का?

SCROLL FOR NEXT