Manasvi Choudhary
त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी महागड्या फेशिअलची गरज नाही. तुम्ही जर ७ दिवस घरच्या घरी सोपे उपाय केला तर चेहऱ्यावर फरक दिसेल.
रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात कापूस भिजवून त्याने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर तुमच्या नेहमीच्या फेस वॉशने चेहरा धुवा.
एका सुती कापडात बर्फाचा खडा गुंडाळून तो २ मिनिटे चेहऱ्यावर फिरवा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते, सूज कमी होते आणि त्वचा घट्ट होते.
बेसन, हळद, दही आणि गुलाबपाणी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळा. झोपण्यापूर्वी या मिश्रणाने चेहऱ्यावर ५ मिनिटे मसाज करा.
दररोज किमान ३-४ लिटर पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
बाहेर गेल्यानंतर तेलकट पदार्थ आणि जास्त साखर खाणे टाळा यामुळे त्वचेचे नुकसान होते.