Rashmika-Vijay : रश्मिका - विजयनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिली गुडन्यूज; 'तो' PHOTO आला समोर, चाहत्यांना मिळाला सुखद धक्का

Rashmika-Vijay - Ranabaali : साऊथ कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी चाहत्यांना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गुडन्यूज दिली आहे. त्यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Rashmika-Vijay - Ranabaali
Rashmika-Vijaysaam tv
Published On
Summary

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रश्मिका-विजयने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

रश्मिका-विजयचे हैदराबादमध्ये थाटामाटात रिसेप्शन पार पडणार आहे.

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर 'विरोश' (VIROSH) उदयपूर विमानतळावर स्पॉट झाले. अशात आता लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. नुकतेच त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

रश्मिका-विजयने दिली गुडन्यूज

रश्मिका-विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. हे नवीन जोडपे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. रश्मिका-विजयच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल 'राणाबली' (Ranabaali ) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे पोस्टर समोर आले आहे.

'राणाबली' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये विजय आणि रश्मिकाने एकमेकांचा हात पकडलेला पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये त्यांचे चेहरे दाखवले नसून त्यांची केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या नुकत्याच शेअर झालेल्या पोस्टमध्ये रश्मिका-विजयचा लूक पाहायला मिळत आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा 'राणाबली' आणि रश्मिका मंदाना 'जयम्मा' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरच्या कॅप्शनला लिहिलं की, "आमचे राणाबली आणि जयम्मा कायमचे एकत्र..." तसेच पोस्टमध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील सांगितली गेली आहे. चित्रपट 11 सप्टेंबर 2026ला जगभरात रिलीज होणार आहे.

'राणाबली' चित्रपटाची कथा

'राणाबली' चित्रपटात प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. 'राणाबली' हा 19 व्या शतकातील एक अ‍ॅक्शन-ड्रामा आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा 1854 ते 1878 दरम्यान ब्रिटीश अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या एका क्रूर, बंडखोर व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहेत. राहुल सांकृत्यन दिग्दर्शित हा चित्रपट वसाहतवादी शोषण, दुष्काळ आणि प्रतिकार या विषयांवर प्रकाश टाकतो.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता दोघे 'राणाबली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटात हॉलिवूड अभिनेत अर्नोल्ड वोस्लू हा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच अजय-अतुलने चित्रपटाला संगीत दिले आहे. तेलुगु, तमिळ ,मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये चित्रपट पाहायला मिळणार आहे. चाहते दोघांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत.

Rashmika-Vijay - Ranabaali
Famous Actress : "हिरोच त्याच्या चित्रपटाची हिरोईन निवडतो..."; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं बॉलिवूडमधलं सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com