Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी

Gadchiroli BJP Leader Mukteshwar Katve Accident News : गडचिरोली येथे दुचाकी अपघातात भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचे निधन झाले. कारगिल चौकात डुकराच्या धडकेमुळे अपघात झाला असून राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी
Gadchiroli BJP Leader Mukteshwar Katve Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • दुचाकीसमोर डुक्कर आल्याने भीषण अपघात

  • भाजपचे माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचे निधन

  • कारगिल चौकात रात्री १० वाजता घटना

  • राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली

Gadchiroli Kargil Chowk BJP Leader Mukteshwar Katve Accident Death गडचिरोलीत भाजपच्या माजी शहराध्यक्ष तसेच नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचं भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. डुक्कर धावत्या दुचाकीसमरून आडवा गेल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. सदर घटना शुक्रवाी रात्री १० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील कारगिल चौकात घडली. या घटनेने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काटवे हे शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे जात होते. याचदरम्यान वाटेत आडवा आलेल्या डुकराने त्यांना धडक दिली आणि ते खाली कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी
Malad Fruit Seller : फळांना लावलं जातंय उंदीर मारण्याचं औषध, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; संतापजनक Video व्हायरल

स्थानिक नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रचंड रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भाजपसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी
Today Horoscope : काहींचं प्रेम बहरणार, तर कुणाला आर्थिक अडचण येणार; कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

मुक्तेश्वर काकडे हे यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा ते निवडून आले. त्यानंतर ते नगर परिषदेचे आरोग्य सभापती झाले. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे गडचिरोली शहरावर आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com