Sara Ali Khan Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Angry : सारा अली खानच्या ड्रेसवर एअर होस्टेजकडून पडला ज्यूस, रागाच्या भरात उठली अन्... VIDEO VIRAL

Sara Ali Khan Angry Viral Video : कायमच हसतमुख राहणाऱ्या सारा अली खानचा सध्या भडकलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. साराच्या ड्रेसवर ज्यूस सांडल्यामुळे ती भडकली आहे.

Chetan Bodke

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराला आपण कायमच वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे. सारा कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

साराने आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे पापाराझींसह चाहत्यांमध्ये स्वत: ची एक वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे. कायमच हसतमुख राहणाऱ्या साराचा सध्या भडकलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सारा भडकलेल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

सारा विमानातून प्रवास करत होती. यावेळी तिच्या ड्रेसवर एअर होस्टेजकडून ज्यूस सांडल्यामुळे ती चांगलीच संतापली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. 'व्होम्पला' ह्या इन्स्टा पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती. यावेळी तिच्या ड्रेसवर एअर होस्टेजकडून चुकून ज्यूस पडल्यामुळे ती प्रचंड संतापली आहे.

ज्यूस चुकून सांडताच अभिनेत्री एअर होस्टेजकडे रागाने बघत उभी राहते. तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्री ट्रोल देखील होत आहे. अभिनेत्री एका जाहिरातीची शुटिंग करत असल्याचं कळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, साराच्या हावभावावरून ती अभिनय करत असल्याचं कळत आहे. तिच्या अभिनयावरून ती कोणत्या तरी जाहिरातीची शुटिंग करत असल्याचं कळत आहे.

सारा अली खान गेल्या काही दिवसांपूर्वी अनंत- राधिकाच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. ती त्या लग्नामध्ये फॅशनमुळे चर्चेत आली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान सुद्धा कॅमेऱ्यात स्पॉट झाला होता. त्याशिवाय, सारा आणि वीरचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे दोघांचाही पुन्हा एकदा पॅचअप झालाय का ? अशीही सोशल मीडियावर चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT