चित्रपट आणि मालिकेंमध्ये आपल्या अनोख्या भूमिकेंसाठी अभिनेत्री रत्ना पाठक यांची चाहत्यांमध्ये ओळख कायम आहे. रत्ना पाठक यांनी चित्रपट, सिरीयल आणि नाटकच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये आपली छाप निर्माण केली. आज रत्ना पाठक यांचा वाढदिवस आहे. अभिनेत्री आज आपला ६७ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह हे कपल नेहमीच हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. या कपलच्या लग्नाची चर्चा कायमच चाहत्यांमध्ये होते. (Bollywood)
रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या लग्नामध्ये ना निकाहनामा वाचला, ना सात फेरे घेतले, ना कोणता समारंभ आयोजित केला गेला. मग, यांचे लग्न नेमके कसे झाले? हा प्रश्न कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. रत्ना आणि नसीरुद्दीन यांची पहिली भेट १९७५ मध्ये झालेली. त्यावेळी नसीरुद्दीन यांनी एफटीआयआयमधून पदवी डिग्री घेतलेली तर, रत्ना कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यावेळी दोघेही एका नाटकातच काम करत होते. सत्यदेव दुबे यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकाच्या रियसलमध्ये हे दोघेही एकत्र भेटले होते. नाटकामुळे दोघांचीही चांगली ओळख झाली होती. (Bollywood News)
नाटकाच्या रियसलमुळे त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. दोघांचेही पहिल्या भेटीतलं प्रेम नव्हतं. आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एकमेकांसोबत व्यवस्थित ओळख झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. नसीरुद्दीन शाह यांची पहिली पत्नी परवीन मुराद (मनारा सिक्री) ही होती. तिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नसीरुद्दीन आणि रत्ना काही वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर १ एप्रिल १९८२ मध्ये त्यांनी रोमँटिक पद्धतीने लग्न केले. दोघांनीही सात फेरे, निकाहनामा किंवा पाठवणी अशा सगळ्या पारंपारिक विधींना त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे या कपलने थेट कोर्ट मॅरेजच केले होते. रत्ना यांच्या आई दिना पाठक यांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्टात लग्न केले. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.