Pooja Sawant: पूजा सावंतच्या बिकिनी लूकची होतेय चर्चा, बीचवर पती सिद्धार्थ चव्हाणसोबत करतेय धम्माल

Pooja Sawant And Siddhesh Chavan: पूजा सावंतने हनीमूनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा लग्नानंतरचा हॉट लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Pooja Sawant Photos
Pooja Sawant PhotosSaam Tv
Published On

Pooja Sawant Honeymoon Photo:

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) मागच्या महिन्यात २८ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) लग्न केले. पूजा सावंतच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पूजा सावंतने लग्नानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. त्यानंतर ती हनीमूनसाठी निघून गेली. आता पूजा सावंतने हनीमूनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा लग्नानंतरचा हॉट लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पूजा सावंतने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनीमूनचे काही फोटो शेअर केले आहेत. बीचवर पती सिद्धेशसोबत धम्माल करतानाचे पूजाचे हे फोटो आहेत. पूजाने यावेळी समुद्राच्या लाटांसोबत खेळताना सुंदर पोज दिल्या आहेत. यावेळी पूजाने फ्लावर प्रिंटची बिकिनी परिधान केलीये. त्यावर तिने व्हाइट कलरचा शर्ट कॅरी केलाय. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर पूजाचा पती सिद्धेशने व्हाइट कलरची सँडो आणि ब्लॅक कलरची शॉर्ट परिधान केली आहे. दोघे देखील बीचवर मजा-मस्ती करताना दिसत आहे.

पूजा सावंतने यावेळी वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. यावेळी ती पती सिद्धार्थसोबत रोमँटिक झाल्याचे देखील फोटोमध्ये दिसत आहे. पूजा सावंतने दोन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने सिद्धेशसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत पूजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Dwelling in the paradise of blessings' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Ocean baby', असे लिहिले आहे.

यासोबत पूजा सावंतने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये देखील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिने एक फोटो सिद्धेशचा टाकला आहे. या फोटोवर तिने लिहिले की, 'मी सूर्यास्त चुकवणार नाही याची तो खात्री करतोय.' पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. या फोटोंवर कमेंट्स करत पूजाच्या चाहत्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. सध्या पूजा आणि सिद्धेश हनीमूनमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेड करत आहेत.

Pooja Sawant Photos
Kareena Kapoor साऊथ फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणार, यशच्या 'टॉक्सिक'मध्ये दिसणार?

दरम्यान, पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचे लग्न २८ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. २८ नोव्हेंबरला पूजा सावंतने इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड सिद्धेशसोबतचा फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. सिद्धेश चव्हाण असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

Pooja Sawant Photos
Sidhu Moose Wala: 'किंग इज बॅक' सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी दाखवली बाळाची पहिली झलक, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com