Prajakta Mali Watch Naach Ga Ghuma Film SaamTv
मनोरंजन बातम्या

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळीने नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वेचा ‘नाच गं घुमा’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित कथानकाचे आणि दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Prajakta Mali Watch Naach Ga Ghuma Film

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट नुकतंच थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. सध्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू असून प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटी चित्रपटाचे जोरदार कौतुक करत आहेत. चित्रपटाने दोन ते तीन दिवसांतच ३ कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीने नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वेचा ‘नाच गं घुमा’ चित्रपट पाहिला. अभिनेत्रीने चित्रपट पाहिल्यानंतर इन्स्टाग्राम पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अभिनेत्रीने पोस्टमध्ये चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक केले असून दिग्दर्शनाचेही तिने कौतुक केले आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “निखळ मनोरंजनाबरोबरच काहीना काही विचार देणारे, आपल्या रोजच्या वागण्यात नकळत चांगले बदल घडवून आणणारे चित्रपट मला फार आवडतात. “नाच गं घुमा” हे काम अतिशय सहजपणे करतो. ज्यांच्या ज्यांच्या घरी मदतनीस आहे. त्यांनी त्यांच्या घरच्यांसहीत किंबहुना मदतनीसांसहीतही हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. कधी कधी खो खो हसता हसता डोळ्यात पाणी येईल कळणार नाही. मधू ताईच्या (मधुगंधा कुलकर्णी) लेखनाविषयी, परेश दादाच्या दिग्दर्शनाविषयी आणि मूक्ता ताईच्या कामविषयी; मी पामरानं काय बोलावं. #केवळकमाल #भारीमाणसं #”

“आज मला इथे जाहीरपणे कौतूक करायचय, आमच्या नमूचं. गेली साडेपाच वर्ष हास्यजत्रेत तिचं काम जवळून पाहतेय, तिथेही ती नेहमीच कमाल करते; पण ह्या चित्रपटात तिनं तिचा प्राण ओतलाय. अभिनयातले बारकावे, सहजता, निरागसता, हावभाव, देहबोली… सगळं सगळं एकदम चोख. खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत; कारण तिचं काम मोठ्या पडद्यावर पाहणं ही अभूवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे विकेंडचा सदुपयोग करा.. “आणि ही घुमा थेटरात जाऊन बघा.” निर्माते म्हणून स्वप्नील दा आणि शमा (शर्मिष्टा राऊत) ह्यांचं मनापासून कौतूक केल्याशिवाय मला राहवत नाही. (सगळ्यांचे कष्ट मी जवळून पाहिलेत आणि त्याचं चीज होतय हे पाहून मला भारी आनंद होतोय.)”

“सारंग साठ्ये, अमित फाळके, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकूळ, मधुगंधा गोडबोले, शर्मिष्टा राऊत सगळ्यांनी अफलातून कामं केलीयेत, धमाल आणलीए. मी आणि प्राजक्ताराज ह्या चित्रपटाचा भाग आहोत म्हणून नाही तर खरच खूप दिवसांनी इतका छान सिनेमा पाहिला (पुरावा सेहत जोडलाय...; म्हणून एवढा प्रपंच..!) नक्की बघा #नाचगंघुमा”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT