Myra Vaikul Funny Video: ‘तुझे दात कुठे गेले ?’; गंमतीशीर प्रश्नावर मायरा वायकुळचे मिश्किल उत्तर, म्हणाली...

Myra Vaikul Video: मायरा वायकुळ लवकरच ‘नाच गं घुमा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेटवरील धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Myra Vaikul Viral Funny Videos
Myra Vaikul Viral Funny VideosSaam Tv

Myra Vaikul Viral Funny Videos

'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली 'परी' म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ (Myra Vaikul) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. मायराचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर ती नेहमी नवनवीन व्हिडीओ शेअर करत संपर्कात राहते. (Marathi Actress)

मायराच्या या प्रत्येक व्हिडीओला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळते. मायरा वायकुळ लवकरच ‘नाच गं घुमा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Social Media)

Myra Vaikul Viral Funny Videos
Crew Box Office Collection Day 4: पहिला सोमवार 'क्रू'साठी ठरला फायदेशीर, चौथ्या दिवशीही केली जबरदस्त कमाई

‘राजश्री मराठी’च्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये तिची धम्माल मस्ती पाहायला मिळत आहे. ती या व्हिडीओमध्ये अभिनेता सारंग साठ्ये सोबत मस्ती करताना दिसते. व्हिडीओमध्ये, मायराला ‘तुझे दात कुठे गेले ?’ असा गंमतीदार प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर तिने ‘पडले’ असे उत्तर दिले. तिने एक दात पडल्याचं सांगितले. सध्या तिचा हा गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Viral Video)

या व्हिडीओवर अनेकांनी मायराच्या अभिनयाचे कौतुक केले आहे तर काहींनी काळजी केली आहे. ‘’ ‘मायराचे दात कोणी नेले. लवकर लवकर तिला आणून द्या. तिला बिचारीला खायला त्रास होत आहे. तरी सांभाळून खा.’ असं म्हणत तिला काळजी घ्यायला सांगितले. ‘क्यूट मायरा’ असं एका चाहत्याने कमेंट केली आहे. मायराची ही व्हिडीओ ६२ हजारांहून अधिक चाहत्यांनी पाहिली असून हजारो युजर्सने व्हिडीओला लाईक्स केले. (TV Serial)

Myra Vaikul Viral Funny Videos
Kiran Mane: छत्रपती शाहू महाराज्यांना अभिवादन करत किरण मानेंनी केला आगामी प्रोजेक्टचा श्री गणेशा, पोस्ट करत म्हणाले...

'तुझी माझी रेशीमगाठ' या मराठी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मायरा ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी सीरियलमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेतून मायराने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले. तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. मायराने ‘चला हवा येऊ द्या’ मधूनही चाहत्यांचे मनोरंजन केले. (Entertainment News)

Myra Vaikul Viral Funny Videos
Ajay Devgn Networth: अजय देवगणचे खरे नाव तुम्हाला माहितीये?, दिसण्यावरून मिळायचे टोमणे; आज आहे कोट्यवधीचा मालक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com