Kiran Mane: छत्रपती शाहू महाराज्यांना अभिवादन करत किरण मानेंनी केला आगामी प्रोजेक्टचा श्री गणेशा, पोस्ट करत म्हणाले...

Kiran Mane Post: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आहे.
Kiran Mane New Project
Kiran Mane New ProjectInstagram

Kiran Mane New Project

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडिया पोस्टद्वारे ते स्पष्टपणे आणि बेधडकपणे आपले मत मांडत असतात. नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण करून त्याने आपली प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे. राजकीय असो, सामाजिक असो कोणत्याही विषयांवर ते थेट बोलताना दिसतात. त्यांच्या या पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेतही असतात. नुकतंच अभिनेत्याने चाहत्यांना आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आहे. (Marathi Actor)

Kiran Mane New Project
Ajay Devgn Networth: अजय देवगणचे खरे नाव तुम्हाला माहितीये?, दिसण्यावरून मिळायचे टोमणे; आज आहे कोट्यवधीचा मालक

‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने नेहमीच चर्चेत राहतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली की, “...आजपासून नवीन प्रोजेक्टच्या शुटिंगला सुरूवात करतोय. करवीर नगरी कोल्हापूरात. काल मनात आलं, माझ्या शाहुराजाला मुजरा करून येऊया. गेलो शाहू पॅलेसला... मन भरुन आलं. मन आणि मेंदूत अफाट उर्जा आणि बाहूंमध्ये शंभर हत्तींचं बळ घेऊन आलोय! प्रोजेक्टविषयी लवकरच सांगेन... पहिला प्रोमो आल्यावर. तोपर्यन्त stay tunned” (Social Media)

शेअर केलेल्या फोटोंमध्ये किरण माने छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना दिसत आहेत. तर सोबतच क्लॅपसोबतही फोटो शेअर केलेला आहे. आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती त्यांनी ब्लर केलेली आहे. नक्की किरण माने यांचा आगामी प्रोजेक्ट काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. किरण माने यांच्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Marathi Film)

Kiran Mane New Project
Ajay Devgn Birthday: अजय देवगणने 33 वर्षांत 100 चित्रपटात केलं काम, असा बनला बॉलिवूडचा 'सिंघम'

किरण माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘बिग बॉस मराठी ४’मधून त्यांना महाराष्ट्रातल्या घराघरांत ‘सातारचा बच्चन’ म्हणून ओळख मिळाली. बिग बॉसनंतर किरण माने ‘रावरंभा’ चित्रपटातून तर ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आले. किरण माने ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘बिग बॉस मराठी ४’, ‘रावरंभा’, ‘सिंधुताई माझी माई’ अशा वेगवेगळ्या कलाकृतींतून चाहत्यांसमोर आले होते. (Entertainment News)

Kiran Mane New Project
Kapil Sharma Birthday: टेलिफोन बुथवर काम ते प्रसिद्ध कॉमेडीयन, जाणून घ्या कॉमेडीयन कपिल शर्माचा खडतर प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com