Ajay Devgn Birthday: अजय देवगणने 33 वर्षांत 100 चित्रपटात केलं काम, असा बनला बॉलिवूडचा 'सिंघम'

Ajay Devgn Filmy Career: आपल्या दमदार अभिनय आणि स्टंटच्या माध्यमातून अजय देवगणने प्रेक्षकांचे मन जिंकले. अजय देवगणने कॉमेडी आणि अ‍ॅक्शनपासून ते प्रत्येक प्रकारची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
Ajay Devgn
Ajay Devgn Saam Tv

Ajay Devgn Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये अजय देवगणचे नाव घेतलं जाते. बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट मॅन वीरू देवगण यांचा मुलगा असलेल्या अजय देवगणने २२ व्या वर्षी 'फूल और कांटे' चित्रपटातून बॉलवूडमध्ये एन्ट्री केली. आपल्या दमदार अभिनय आणि स्टंटच्या माध्यमातून अजय देवगणने प्रेक्षकांचे मन जिंकले. अजय देवगणने कॉमेडी आणि अ‍ॅक्शनपासून ते प्रत्येक प्रकारची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

अजय देवगणचा जन्म २ एप्रिल १९६९ साली पंजाबी कुटुंबात झाला. वीरू देवगण यांनी आपल्या मुलाला हिरो बनण्याचे स्वप्न पाहिले होते. अजय देवगणची आई वीना देवगण या फिल्म प्रोड्यूसर होत्या. अजय देवगण हा फिल्मी फॅमिलीमधून असल्यामुळे त्याने देखील सिनेसृष्टीत नशीब आजमावले आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील झाला. अजय देवगणने बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त पोलिसाची भूमिका साकारली आहे आणि ती प्रेक्षकांना आवडते देखील. त्याच्या 'सिंघम', 'सिंघम रिटर्न' या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली. लवकरच तो 'सिंघम अगेन'मधून भेटीला येणार आहे.

अजय देवगणने 'फूल और कांटे' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. फार कमी लोकांना माहित असेल की 'फूल और कांटे'च्या आधी अजयने बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याने ‘प्यारी ब्राह्मण’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते.

'फूल और कांटे' हा अजय देवगणचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या अफाट यशानंतर अजयने 'जिगर' या चित्रपटामध्ये काम केले. त्याचा हा चित्रपट देखील यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने 'दिलवाले', 'सुहाग', 'विजयपथ' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर अजयने महेश भट्ट यांच्या 'जख्म' या चित्रपटात काम केले. याच चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

Ajay Devgn
Kapil Sharma Birthday: टेलिफोन बुथवर काम ते प्रसिद्ध कॉमेडीयन, जाणून घ्या कॉमेडीयन कपिल शर्माचा खडतर प्रवास

अजय देवगने आपल्या करिअरमध्ये 'सिंघम', 'गोलमाल', 'बोल बच्चन' यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मल्याळम चित्रपटावर आधारित 'दृश्यम 2' हा त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. २००० साली त्याने ‘अजय देवगन फिल्म्स’ नावाने स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन केली. आज अभिनयासोबतच अजय देवगणने दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. अजय देवगणने मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील घेतले आहे आणि तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्याच्या अनेक ॲक्शन-पॅक्ड चित्रपटांमध्ये त्याने मार्शल आर्टचे कौशल्य दाखवले आहे.

Ajay Devgn
Remo D'Souza Birthday: वडिलांचा इच्छा होती पायलट व्हावं, मात्र रेमो डिसुझाने पाय जमिनीवर ठेवत घेतली गगन भरारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com