Jennifer Winget News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jennifer Winget News : 'द नाईट मॅनेजर'ची ऑफर शोभिता धुलिपालाला नाही तर जेनिफर विंगेटला होती, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

The Night Manager Web Series : टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर विंगेटने एका मुलाखतीमध्ये वेबसीरीजबद्दल काही खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'द नाईट मॅनेजर' या वेबसीरीजने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूरसह शोभिता धुलिपालाही प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतंच टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर विंगेटने एक मुलाखत दिली आहे.

मुलाखतीमध्ये जेनिफरने वेबसीरीजबद्दल काही खुलासे केले आहेत. या वेबसीरीजची ऑफर शोभिता धुलिपालाच्या आधी जेनिफरला होती. पण ही ऑफर जेनिफरला न मिळता शोभिता धुलिपालाला मिळाली आहे. यावेळी तिने नेहमीच मला माझा अतिउत्साह नडतो, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

'द नाईट मॅनेजर' वेबसीरीजमध्ये शोभित धुलिपाला मुख्य भूमिकेत आहे. या वेबसीरीजची ऑफर सर्वात आधी जेनिफरला होती, असा खुलासा स्वत: जेनिफरने केला आहे. जेनिफर विंगेटने मुलाखतीत सांगितले की, "माझी भुमिका शोभिताला मिळाल्यामुळे मी प्रचंड नाराज झाले होते. आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. माझ्या अतिउत्साहामुळे मला त्या वेबसीरीजमध्ये काम मिळाले नाही. अनेकदा मला माझा अतिउत्साह नडलेला आहे. अनेकदा माझ्या हातातून प्रोजेक्ट निसटले आहेत. मला वेबसीरीज खूप आवडली. मला सर्वात आधी शोभिताने साकारलेल्या कावेरीच्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली होती."

जेनिफर विंगेट मुलाखतीमध्ये पुढे म्हणाली, "माझ्या हातातून अनेक प्रोजेक्ट गेल्यामुळे मी नाराज होते. आयुष्य आहे, आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. गेलेल्या गोष्टीपेक्षा आपल्याला पुढे जाऊन खूप चांगली गोष्ट मिळते, असा माझा विश्वास आहे. जेव्हा एखादी गोष्ट माझ्या हातातून जाते, त्यावेळी मला पुढे जाऊन खूप काहीतरी चांगलं मिळतं." जेनिफर विंगेटचा आज वाढदिवस आहे. ती आज आपल्या फॅमिलीसोबत ३९ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. तिचा जन्म ३० मे १९८५ रोजी झालेला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या ह्या प्रोजेक्टची जोरदार चर्चा होत आहे.

जेनिफर शेवटची सोनी लिव्हवरील 'Raisinghani Vs Raisinghani' या वेब शोमध्ये दिसली होती. त्यासोबतच अभिनेत्री जेनिफर, 'अकेले हम अकेले तुम', 'राजा की आएगी बारात', 'कुछ ना कहो' अशा अनेक वेब शोमधून आणि चित्रपटांतून तिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT