Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?

Krushna Abhishek And Govind Controversy : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला वाद हा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतला वाद आहे. पण कृष्णा अभिषेक आणि गोविंद नेमका यांच्यात नेमका वाद काय आहे ? जाणून घेऊया...
Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?
Krushna Abhishek BirthdayInstagram

सुप्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत असते. या मल्टी टॅलेंटेड अभिनेत्याचा आज ४१ वा वाढदिवस आहे. ३० मे १९८३ रोजी जन्मलेल्या कृष्णाच्या कॉमेडीचे जगभरात चाहते आहेत. कृष्णा अभिषेक आणि अभिनेता गोविंदा हे मामा भाचे आहेत.

कृष्णा हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. मामा भाच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून कमालीचा चर्चेत आला आहे. पण अभिनेता कृष्णा अभिषेक आणि अभिनेता गोविंद नेमका यांच्यात नेमका वाद काय आहे ?, त्यांच्यातील वाद कुठून सुरू झाला? जाणून घेऊया...

Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?
Paresh Rawal Birthday : बँकेतली नोकरी सोडून झाले बॉलिवूडचा 'बाबू भैय्या', बॉसच्याच मुलीच्या प्रेमात पडले होते परेश रावल

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाली. कृष्णा एक शो करत होता, त्या शोमध्ये येण्यासाठी गोविंदाने नकार दिला होता. पण कृष्णाने खूप समजवल्यानंतर गोविंदाने होकार दिला.

कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा हिने ट्विटमध्ये लिहिलं की, काही लोक केवळ पैशांसाठी नाचतात. हे ट्वीट पाहून गोविंदाच्या पत्नीला वाटले की, कश्मिराचे हे ट्विट आपल्या कुटुंबासाठ आहे. तेव्हापासून कृष्णा आणि गोविंदाच्या परिवारात तणाव निर्माण झाला. कश्मिरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केले होते.

Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?
Pushpa 2 Song: 'पुष्पा 2' चित्रपटातील 'अंगारो' गाणं रिलीज; पुष्पा आणि श्रीवल्लीच्या हटके डान्सने वेधलं लक्ष

कृष्णाच्या मुलांच्या वाढदिवसाला गोविंदा आणि सुनीता न आल्यामुळे कृष्णा अभिषेक आणि गोविंदाच्या कुटुंबात सुरू असलेला वाद आणखी वाढला. या प्रकरणावर सुनीताने सांगितले की, आम्हाला वाढदिवसाच्या पार्टीला बोलवले नाही. पण, कृष्णाने दुसऱ्या मुलाखतीत सांगितलं होते की, आम्ही मामा गोविंदा आणि मामी सुनिता यांना बर्थडे पार्टीला बोलवलं होतं. त्यामुळे कृष्णा मामा गोविंदावर नाराज होता. या वादादरम्यान कृष्णाने मुलाखतीत सांगितले होते की, मामा गोविंदा आपल्या मुलांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला नव्हता. यामुळे मी मामावर नाराज होतो. तर, गोविंदाने कृष्णाच्या मुलाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो असल्याचे सांगितले.

Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?
Maharaj Movie Poster: आमिर खानचा मुलगा बनला 'महाराज', चित्रपटातील जुनैद खानचा फर्स्ट लूक आऊट

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातला वाद कपिल शर्मा शोमध्येही पाहायला मिळाला होता. एकदा गोविंदा पत्नी सुनीतासोबत द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. मात्र, त्या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेकने सहभाग घेतला नव्हता. त्या एपिसोडमध्ये कृष्णा दिसला नसल्यामुळे दोघांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले होते.

Krushna Abhishek Birthday : कृष्णा अभिषेक आणि गोविंदातला नेमका वाद काय ? मामा- भाच्यात कशावरून बिनसलंय?
Vanita Kharat Post: फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरातून प्रेमाचा वर्षाव; वनिता खरातची पोस्ट व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com