Deepika Padukone As Lady Singham Instagram
मनोरंजन बातम्या

Singham Again: दीपिका पदुकोण बनली ‘लेडी सिंघम’; ‘सिंघम अगेन’मध्ये दिली अजय देवगनची आयकॉनिक पोझ

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपटातील लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिच्या ह्या डॅशिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Deepika Padukone As Lady Singham

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ मधील ‘आता माझी सटकली’ हा डायलॉग आजही प्रसिद्ध आहे. अजयची ‘बाजीराव सिंघम’ ही भूमिका पोलिसांचे प्रतिनिधित्व करतो. 'सिंघम' आणि 'सिंघम २' दोन्हीही चित्रपट हिट ठरले. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा (Singham Again Film Announcement) करण्यात आली होती. चित्रपटामध्ये, अजय देवगणसोबत पोलिसांच्या भूमिकेत दीपिका पदुकोणही दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपटातील लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Director Rohit Shetty) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिच्या ह्या डॅशिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची सध्या जोरदार शूटिंग सुरू आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या खासगी आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ‘गुडन्यूज’ दिली होती. अभिनेत्री प्रेग्नेंट असूनही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा लेडी सिंघम लूक जोरदार व्हायरल होत असून तिचा हा चित्रपटातला दुसरा लूक आहे. यापूर्वीही दीपिकाचे चित्रपटातील काही लूक व्हायरल झाले होते. (Bollywood Film)

रोहित शेट्टीने नुकतंच दीपिकाचा चित्रपटातील लूक शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, रोहित शेट्टीने दीपिकाला हिरो म्हटलं आहे. ‘सिंघम अगेन’च्या नव्या पोस्टरमध्ये दीपिका अजयची आयकॉनिक पोझ देताना दिसतेय. तर दीपिकाने डोळ्याला ब्लॅक गॉगल आणि अजयची वाघासारखी आयकॉनिक पोज देताना ती दिसते. "माझी हिरो, रीलमध्येही आणि रियलमध्येही. लेडी सिंघम", असं कॅप्शन रोहितने दीपिकाचा फोटो शेअर करताना दिलेली आहे. रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरवर दीपिकाने ‘Let’s Do This!’ म्हणत कमेंट केली आहे. #लेडीसिंघम #शक्तीशेट्टी असा ही हॅशटॅग वापरलाय. सध्या दीपिकाचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. (Bollywood News)

सिंघम अगेनमध्ये अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत रणवीर सिंह, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, श्वेता तिवारी, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ मल्टीस्टारकास्ट पाहायला मिळेल. सध्या चित्रपटाची शूटींग सुरु आहे. चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं एकूण बजेट २५० कोटी रुपयांचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटासाठी अजय देवगणने चित्रपटाच्या कमाईचा २० टक्के हिस्सा घेणार आहे. ही रक्कम सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT