Singham Again: 'आली रे आली लेडी सिंघम', 'सिंघम अगेन'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर

Deepika Padukone First Look From Singham Again: रोहित शेट्टीने सिंघम अगेनमधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
Deepika Padukone First Look From Singham Again
Deepika Padukone First Look From Singham AgainSaam TV

Bollywood Actress Deepika Padukone:

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन'बाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अजय देवगण स्टारर या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग केमियो करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने घोषणा केली होती की या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण लेडी सिंघमची भूमिका साकारताना दिसणार आहे. दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. अशामध्ये आता दीपिका पादुकोणचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रीची जबरदस्त स्टाईल दिसत आहे.

रोहित शेट्टीने सिंघम अगेनमधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. रोहित शेट्टीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, स्त्री हे सीतेचे रूप आहे आणि दुर्गेचेही... भेटा आमच्या पोलिसातील सर्वात क्रूर आणि हिंसक अधिकारीला... शक्ती शेट्टी! आमची लेडी सिंघम...दीपिका पादुकोण!' रोहित शेट्टीच्या या पोस्टवर दीपिकाचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगने जबरदस्त कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये असे लिहिले की, 'अरे देवा...आली रे आली|'

अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील नवरात्रीनिमित्त आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. तिने देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिंघम अगेनमधील फर्स्ट लूकचा फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'ओळख करून देते, शक्ती शेट्टीची' या फोटोमध्ये दीपिका पादुकोण पोलिसांच्या गणवेशामध्ये दिसत आहे. तर आरोपीच्या तोंडामध्ये बंदुकीने गोळी मारताना ती दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती बंदूकीसोबत पोझ देताना दिसत आहे.

Deepika Padukone First Look From Singham Again
Sindhutai Maazi Maai Latest Update: “चिंधी म्हणून तयार होताना…”, छोट्या चिंधीने व्हिडीओतून शेअर केला आतापर्यंतचा प्रवास

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम' चित्रपटाने (Singham Movie) थेट पोलीस फ्रेंचायझी सुरू केली. त्यानंतर रोहितने 'सिम्बा'मध्ये (Simbha) रणवीर सिंग आणि 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारसोबत आणखी दोन पोलीस सिनेमाला दिले. आता रोहित शेट्टी लवकरच 'सिंघम अगेन' हा चित्रपट (Singham Again Movie) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाचा लेडी सिंघम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे.

Deepika Padukone First Look From Singham Again
Viral Video: ‘नवऱ्याच्या कृत्यांचं शिल्पा समर्थन करतेय’, पती राज कुंद्राच्या स्टाइलमध्ये दिसल्याने अभिनेत्री होतेय ट्रोल, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com