Viral Video: ‘नवऱ्याच्या कृत्यांचं शिल्पा समर्थन करतेय’, पती राज कुंद्राच्या स्टाइलमध्ये दिसल्याने अभिनेत्री होतेय ट्रोल, VIDEO व्हायरल

Shilpa Shetty And Raj Kundra Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लूक्समुळे प्रचंड चर्चेत आले आहेत.
Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral Video
Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral VideoInstagram

Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral Video

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लूक्समुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राज कुंद्राने मास्क घातलेला लूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. दरम्यान नेटकरी त्याला ‘मास्क मॅन’ म्हणूनच टॅग करताना दिसून येत आहे. आता राजनंतर शिल्पा शेट्टीसोबत त्यांच्या मुलांनाही मास्कचे वेड लागले आहे. सध्या ते फिरत असतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral Video
Singham Again: 'आली रे आली लेडी सिंघम', 'सिंघम अगेन'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर

दरम्यान, राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातून बाहेर येताच सतत फेस मास्क घालून फिरताना दिसत आहे. कधी मास्क घालून तर कधी चेहरा झाकलेल्या लूकमध्ये आपण अनेकदा राज कुंद्राला पाहिलं आहे. जेलमधून बाहेर पडल्यानंतर कधीच राज कुंद्राने आपला चेहरा मिडीयाला दाखवलेला नाही. सध्या राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या मुलांचा लूक प्रचंड चर्चेत आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीने देखील आपल्या चेहऱ्यावर मास्क लावल्याचे दिसतंय. काळ्या रंगाच्या मास्कमध्ये शिल्पा दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, शिल्पाकडे पापाराझींनी चेहरा दाखवण्याची मागणी केली होती. तिने व्हिडीओच्या शेवटी पापाराझींना चेहरा दाखवला. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ट्रोलिंग करत प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ पाहून ट्रोलर्सने तोंड काळं करुन मीडियासमोर आले आहेत. अशी प्रतिक्रिया दिली.

तर आणखी एकजण म्हणतो, “चुकीची कामं केल्यावर तोंड लपवण्याची वेळ येते”, “नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांचं शिल्पा समर्थन करतेय” तर एकानं तुम्हाला काय उर्फीची हवा लागली का? असा ही प्रश्न उपस्थित केला आहे. अशा असंख्य कमेंट्स करत नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीसह पती राज कुंद्रालाही ट्रोल केलं आहे.

Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral Video
Patthe Bapurao Biopic Announcement: शाहीर साबळेंनंतर आणखी एका लोकशाहीराचे जीवनचरित्र उलगडणार रुपेरी पडद्यावर, ‘पठ्ठे बाबुराव’चं पोस्टर रिलीज

शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे तर, नुकतीच शिल्पा ‘सुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण तिचा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास जादु दाखवू शकला नाही. तर राज कुंद्राबद्दल सांगायचे तर, चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाची गेल्या आठवड्यातच घोषणा झाली आहे. चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे नाव ‘UT69’ असं आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत राज कुंद्रा असून बाकीची स्टारकास्ट गुलदस्त्यातच आहे.

Shilpa Shetty And Raj Kundra Fashion Viral Video
Sindhutai Maazi Maai Latest Update: “चिंधी म्हणून तयार होताना…”, छोट्या चिंधीने व्हिडीओतून शेअर केला आतापर्यंतचा प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com