Sindhutai Maazi Maai Latest Update: “चिंधी म्हणून तयार होताना…”, छोट्या चिंधीने व्हिडीओतून शेअर केला आतापर्यंतचा प्रवास

Sindhutai Maazi Maai News: मालिकेतला आतापर्यंतचा प्रवास छोट्या चिंधीने एक छोटी व्हिडीओ शेअर करत मालिकेतला आतापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
Sindhutai Maazi Maai Latest Update
Sindhutai Maazi Maai Latest UpdateInstagram

Sindhutai Maazi Maai Latest Update

अनाथांची माय म्हणून सिंधुताई सकपाळ यांची सर्वत्र ओळख आहे. याच अनाथांच्या माईचा प्रवास आपल्याला छोट्या पडद्यावरून पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका आली आहे. ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणाऱ्या या मालिकेने फार कमी काळातच प्रेक्षकांची मनं जिंकली.

आजपासून मालिकेमध्ये आपल्याला नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. छोटी चिंधीने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून १५ ऑक्टोबरपासून आपल्याला मोठी सिंधू दिसणार आहे. मालिकेतला आतापर्यंतचा प्रवास बालकलाकार अनन्या टेकवडे अर्थात छोट्या चिंधीने एक छोटी व्हिडीओ शेअर करत मालिकेतला आतापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

Sindhutai Maazi Maai Latest Update
Khatron Ke Khiladi 13 Winner: रॅपर डीनो जेम्स ठरला ‘खतरों के खिलाडी १३’ विजेता; अलिशान कार, ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये

१५ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही दिवसातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये छोटी चिंधी पाहिली, आता १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला मोठी चिंधी अर्थात सिंधुताई येणार आहेत. छोट्या सिंधुताईंचे पात्र अनन्या टेकवडे साकारत होती. आता मोठ्या सिंधुताईंचे पात्र ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काल मालिकेमध्ये छोट्या चिंधीचा अखेरचा दिवस होता. या निमित्ताने अनन्याने सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान अनन्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, “वन लास्ट टाईम चिंधी म्हणून तयार होताना… सिंधूताई यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचे बालपण दाखवण्याची संधी मला चिंधी या पात्रातून दिल्याबद्दल मी कलर्स मराठी चॅनेल, मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमचे आभार मानते.” असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.

सोबतच यावेळी तिने काही BTS सीन्स सुद्धा शेअर केली आहे. सोबतच यावेळी चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तिचे कौतुकही केले. मालिकेत प्रमुख भूमिकेत प्रिया बेर्डे, शिवानी सोनार, किरण माने आणि योगिनी चौक हे कलाकार आहेत. शिवानी सोनारने सिंधुताईंचे पात्र, प्रिया बेर्डेंनी सिंधुताईंच्या आजींचे, योगिनी चौकने सिंधुताईंच्या आईचे तर किरण मानेंनी सिंधुताईंच्या वडीलांचे पात्र साकारले.

Sindhutai Maazi Maai Latest Update
Mahira Khan Wedding Video: माहिरा खानच्या लग्नात फवाद खानची एन्ट्री; नवीन व्हिडीओने चाहत्यांचं वेधलं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com