Singham 3 Release Date Out: 'सिंघम 3' च्या रिलीज डेटची घोषणा! अजय देवगणसह दीपिकाही दिसणार पोलिसांच्या गणवेशात

Singham 3 Release Soon: अजय देवगण, रोहित शेट्टीचा 'सिंघम 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Deepika In Singham 3
Deepika In Singham 3 Saam TV

Ajay Devgn-Deepika Padukone In Singham 3: अजय देवगण 'आता माझी सटकली' हा डायलॉग आजही तितकाच प्रसिद्ध आहे. अजयची बाजीराव सिंघम ही भूमिका पोलिसांचे प्रतिनिधित्व करते. 'सिंघम' आणि 'सिंघम २' दोन्हीही चित्रपट हिट ठरले. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

अजय देवगण पुन्हा एकदा 'बाजीराव सिंघम' बनणार आहे. अजय देवगण, रोहित शेट्टीचा 'सिंघम 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंघम ३ ची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टीचा हा अ‍ॅक्शन चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातील आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण दिसणार आहे.

Deepika In Singham 3
Kangana Ranaut At Eid Party: बाबो! अर्पिता-आयुषच्या ईद पार्टीला कंगनाची हजेरी

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत 'सिंघम ३' विषयी माहिती दिली आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम ३' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. हा १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. रोहितच्या सुपर यशस्वी फ्रँचायझी 'सिंघम'चा हा तिसरा भाग आहे. या वर्षी ऑगस्टपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

यावेळी 'सिंघम ३' प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे, कारण अजय देवगणच्या सोबत दीपिका पदुकोण पडद्यावर दिसणार आहे. रोहित शेट्टीने 'सर्कस'च्या एका कार्यक्रमात दीपिका लेडी सिंघम होणार असल्याची घोषणा केली होती. पोलिसांच्या गणवेशात ती अॅक्शन करताना दिसणार आहे.

अजय देवगण 'भोला'मध्ये दिसला होता. त्यानंतर अजय मैदान या बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २३ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तर दीपिका पदुकोण हृतिक रोशनसह फायटर या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर 'पठान' चित्रपमध्ये देखील ती दिसली अॅक्शन करताना दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com