बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते आणि 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यावर कोलकात्यातील अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले जात आहे. नुकतंच अभिनेत्याच्या हेल्थ विषयी त्यांची सहकलाकार अभिनेत्री देबश्री रॉय हिने सांगितले आहे. नुकतंच अभिनेत्रीने 'झुम टिव्ही'सोबत संवाद साधताना तिने मिथुन यांच्या तब्येतीबद्दल सांगितले. (Bollywood)
(actor mithun chakraborty health condition update actor out of icu will discharge soon from hospital)
सहकलाकार देबश्री रॉयने मिथुन यांच्या हेल्थबद्दल माहिती दिली. "मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीमध्ये सध्या सुधारणा झाली आहे. त्यांना आयसीयु वॉर्ड मधून रिकव्हरी वॉर्डमध्ये आणले आहे. मिथुन यांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ जाणवत होते. मिथुन यांच्यामुळे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी 'शास्त्री' चित्रपटाची शुटिंग पुढे ढकलली आहे." अशी माहिती अभिनेत्री देबश्री रॉय हिने 'झुम टिव्ही'ला दिली. (Mithun Chakraborty)
लवकरच अभिनेत्याला डिस्चार्ज सुद्धा मिळणार आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी काही मेडिकल हेल्थ चेकअप करण्यात येणार आहेत. त्या झाल्यानंतर अभिनेत्याला रूग्णलायातून डिस्चार्ज मिळणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयामध्ये दाखल केल्याचे वृत्त मिळाल्यानंतर क्रिकेटर सौरव गांगुली, पश्चिम बंगलाचे भाजपा प्रमुख सुकांत मुझुमदार यांच्या भेटीला आले होते. मिथुन चक्रवर्ती लवकरच 'शास्त्री' या बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सध्या ते व्यग्र आहेत. (Bollywood News)
मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या सिनेकारकिर्दित स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता आणि डिस्को डान्सर म्हणून त्यांची ओळख इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मिथुन चक्रवर्ती यांना २६ जानेवारीच्या पुर्व संध्येला पद्मभूषण पुरस्कारासाठी नाव जाहीर करण्यात आले. मिथुन यांना आपल्या सिनेकारकिर्दीत एकूण ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.