Arbaj Shaikh: 'सैराट' फेम अभिनेत्याने सुरू केला नवा व्यवसाय, नागराज मंजुळेंनी भेट देत दिल्या शुभेच्छा; VIDEO व्हायरल

Arbaz Khan New Beginning: दागिने असो, सलून असो किंवा हॉटेल क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता या कलाकारांच्या यादीमध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. 'सैराट' चित्रपटामध्ये या अभिनेत्याने काम केले आहे.
arbaj shaikh start new cafe
arbaj shaikh start new cafesaam tv
Published On

Arbaj Shaikh New Cafe:

मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) अनेक कलाकार हे अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त इतर व्यवसायांमध्ये पाऊल ठेवताना दिसत आहेत. आतापर्यंत महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar), सुप्रिया पाठारे (Supriya Pathare), निरंजन कुलकर्णी, प्राजक्ता माळी (Prajakta Mali), श्रेया बुगडे (Shreya Bugde) आणि तेजस्वीनी पंडीत (Tejaswini Pandit) या कलाकारांनी नव्या व्यवसायाला सुरूवात केली.

दागिने असो, सलून असो किंवा हॉटेल क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता या कलाकारांच्या यादीमध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. 'सैराट' चित्रपटामध्ये या अभिनेत्याने काम केले आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं होतं. या चित्रपटाची खूप चर्चा झाली. तसंच चित्रपटाने चांगली कमाई देखील केली. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने अर्चीची तर आकाश ठोसरने परश्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये परश्याच्या मित्राच्या भूमिकेमध्ये दिसलेला सल्ल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखच्या भूमिकेला देखील चांगली पसंती मिळाली. आता अरबाज शेख चर्चेत आला आहे त्यामागचे कारण म्हणजे त्याने आता नव्या व्यवसायाला सुरूवात केली आहे.


सैराट चित्रपटासोबत अरबाज शेखने ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. अरबाज शेखने आता पुण्यामध्ये त्याच्या नव्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. अरबाजने पुण्यामध्ये स्वत:चं नवीन कॅफे सुरू केले आहे. या नव्या व्यवसायासाठी अरबाज शेखला सर्वांकडून खूप चांगल्या शुभेच्छा मिळत आहेत. नुकताच त्याच्या या कॅफेला दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी भेट दिली. याचा व्हिडीओने त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याचसोबत सैराटमधील अर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरूने देखील इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत अरबाजला नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अरबाजच्या या नव्या कॅफेचे नाव ‘बेक बडीज’ असं आहे. त्याच्या या कॅफीची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे. त्याचे हे कॅफे पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजसमोर आहे. अरबाजच्या कॅफेचे आज उद्घाटन होणार आहे. सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com