Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gaurav More Post: "तुमचे उपकार कधीच विसरणार नाही..."; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची खास पोस्ट

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024: हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट करत त्यांना अभिवादन केलंय.

Chetan Bodke

देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरातल्या जनतेमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र एकमेकांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये सेलिब्रिटी मंडळीही मागे नाहीत. हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट करत त्यांना अभिवादन केलंय.

अभिनेता गौरव मोरेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसुन बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केलेला त्या पवित्र वास्तुला २०२२ साली भेट दिली होती. आज १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती. थँक्यू बाबासाहेब तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही...” लंडनमध्ये शिकत असताना बाबासाहेब अभ्यास करत असलेल्या वास्तूला अभिनेत्याने भेट दिली होती. अभिनेत्याने त्या दरम्यानचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. गौरवच्या ह्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. (Social Media)

२४ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले असून हजारो चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या आहे. गौरव मोरेला हास्यजत्रेतून फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला हास्यजत्रेतून 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून ओळख मिळाली आहे. गौरव हास्यजत्रा व्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट्स मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौरव मोरे गेल्या वर्षी 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'महापरिनिर्वाण' चित्रपटातही गौरव मोरे दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

SCROLL FOR NEXT