Aamir Khan And Kiran Khan Dance Video Instagram
मनोरंजन बातम्या

Aamir Khan And Kiran Khan Dance Video: लेकीच्या लग्नात बेभान होऊन नाचला आमिर खान; एक्स वाइफसोबत केला भन्नाट डान्स

Aamir Khan Daughter Marriage News: सध्या सोशल मीडियावर आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव या दोघांचाही एक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Chetan Bodke

Aamir Khan And Kiran Khan Dance Video

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) काल (३ जानेवारी) लग्नबंधनात अडकली. आयरा खान (Ira Khan) आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने (Nupur Shikhare) मुंबईतल्या बांद्रामधील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवाराने हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव या दोघांचाही एक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्याही लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसतेय. त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर सुधा अजमेरा नावाच्या एका युजरने एक व्हिडीओ शेअर केला. (Social Media)

शेअर केलेल्या ह्या व्हिडीओमध्ये काही महिला गाणं गाताना दिसत आहे. आणि त्यांच्या गाण्यावर अभिनेता आमिर खान, त्याची एक्स पत्नी किरण राव आणि काही कुटुंबीय एकत्रित डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्यांचा मुलगा आझादही उपस्थित होता. खान कुटुंबीयांचा हा हटके डान्सचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड भावला आहे. (Viral Video)

आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. आयराने लाइट पिंक कलरचा शरारा परिधान केला होता. नववधूच्या रुपामध्ये आयरा खूपच क्युट दिसत होती. तर नुपूरने डार्क ब्लू कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. मुलीच्या लग्नात आमिर खानचा लूक देखील जबरदस्त होता. (Bollywood)

आमिर खानने व्हाइट कलरचा कुर्ता, धोतर आणि डोक्यावर पिंक कलरचा फेटा घालला होता. तर एक्स वाईफ किरण रावने ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला होता. येत्या ८ जानेवारीला उदयपूरमध्ये महाराष्ट्रीयन परंपरेनुसार सप्तपदी घेत लग्नगाठ बांधणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; ३४८ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

SCROLL FOR NEXT