आमिर खान गर्लफ्रेंड गौरीसोबत नवीन घरात राहायला गेला आहे.
आमिर खानने गौरीसोबत लग्न केले आहे.
आमिर खानने 2025मध्ये गौरीसोबतचे त्याचे नातं अधिकृत केले.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. तो गेल्या काळी काळापासून गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत राहत आहे. नुकतेच आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. ते आता मुंबईत एका आलिशान घरात राहत आहेत. आमिर खान अनेकदा गौरीबद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त करताना दिसतो. नुकतेच त्यांना एकत्र पुन्हा स्पॉट केले गेले.
मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नवीन घरात राहायला गेला आहे. कुटुंबाच्या जवळ असलेल्या त्याच्या मुंबईतील नवीन आलिशान घरात दोघे राहतात. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि अलिकडेच नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल बोलला. आमिर म्हणाला, "माझ्या 'हॅपी पटेल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अगदी मधोमध हे घडत आहे. त्यामुळे ही एक प्रकारची धावपळ आहे..."
गौरी स्प्रॅटसोबतच्या आपल्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलताना त्याने सांगितले, "मी आणि गौरी एकमेकांबद्दल खूप Serious आहोत. आम्ही प्रेमाच्या वचनात बांधले गेलो आहोत. आम्ही Partners आहोत. आम्ही एकत्र आहोत. लग्नाची गोष्ट म्हणाल तर, माझ्या मनात, मी आधीच तिच्याशी लग्न केले आहे... त्यामुळे आम्ही त्याला official स्वरूप देतो की नाही हे मी वेळेनुसार ठरवेन..."
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.