'ओ रोमिओ' चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रमात शाहिद आणि तृप्ती उशीरा पोहचले.
'ओ रोमिओ' चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रमातून नाना पाटेकर निघून गेले.
'ओ रोमियो' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026ला रिलीज होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'ओ रोमिओ' मुळे चांगला चर्चेत आहे. शाहिद कपूरच्या 'ओ रोमिओ' (O ROMEO) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच कार्यक्रम थाटात पार पडला. 'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूरसोब तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी आणि फरीदा जलाल यांचा समावेश आहे. अशात ट्रेलर ट्रेलर लाँच दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काल शाहिद कपूरच्या 'ओ रोमिओ'चा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम सुरू होण्याआधीच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर निघून गेले. यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. खरतंर मिळालेल्या माहितीनुसार, 'ओ रोमिओ'चा ट्रेलर लाँच कार्यक्रमाला नाना पाटेकर दुपारी 12 वाजता आले होते. मात्र शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी हे दीड तास उशिरा म्हणजे दीड वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यामुळे नाना पाटेकर वैतागून आणि कंटाळून ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले.
'ओ रोमिओ'चा ट्रेलर लाँच कार्यक्रमातून नाना पाटेकर निघून गेल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, "नाना कार्यक्रमातून निघून गेले आहेत, पण तरीही मला त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल. नाना हे वर्गातील खोडकर मुलासारखे आहेत. जो इतरांना चिडवतो. तसेच सर्वांचे भरपूर मनोरंजन देखील करतो. मी नानांना 27 वर्ष ओळखतो. आमची चांगली मैत्री आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. जर ते इथे असते तर खूप छान वाटले असते. पण त्यांनी एक तास वाट पाहिली. मग ते त्यांच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये उठले आणि कार्यक्रमातून निघून गेले. जाताना ते म्हणाले, "मला तासभर वाट पाहायला लावले म्हणून मी निघतो आता..." आम्हाला त्याचे वाईट वाटले नाही. याच गोष्टीमुळे नाना म्हणजे नाना पाटेकर आहेत."
मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद आणि तृप्ती जवळच्याच एका मॉलमध्ये चित्रपटाच्या पोस्टर लाँच कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांना ट्रेलर लाँच कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला. नेटकरी नानांच्या व्हायरल व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. काही नेटकरी शाहिदला शिस्तीसाठी ट्रोल करत आहेत. तर नाना पाटेकरांची बाजू घेताना दिसत आहे.
शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजे येणारा 'व्हॅलेंटाईन डे' खूप खास असणार आहे. चित्रपट अॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.