Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री होणार? घरातील सदस्याने दिली हिंट

Bigg Boss Marathi 6-Rakhi Sawant : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या एन्ट्रीने घरात चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळेल.
Bigg Boss Marathi 6-Rakhi Sawant
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे.

सध्या अनुश्री माने चांगलीच चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री होणार असल्याचे बोले जात आहे.

बिग बॉस हिंदी संपल्यानंतर आता 'बिग बॉस मराठी 6' प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोने दोन आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रोज घरात नवीन राडा आणि भांडणे पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन, कॅप्टन्सी टास्क, राशन टास्क , एलिमिनेशन टास्क, घरातील ड्युटी या सर्वांमुळे शो चांगलाच चर्चेत आहे. तसेच घरात अनेक ग्रुप देखील पडलेले पाहायला मिळत आहे.

बिग बॉसचे घर म्हटले की, ड्रामा हा आलाच. घरात असेच अनेक ड्रामा क्वीन आणि ड्रामा किंग असतात. जे संपू्र्ण शो गाजवतात. गेल्या सीझनला निक्की तंबोळीने आपल्या ग्लॅमरस अंदाजने आणि ड्रामाने शो गाजवला होता. आता या सीझनला बिग बॉस हिंदीची ड्रामा क्वीन मराठी शोमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 'बिग बॉस मराठी 6' राखी सावंत एन्ट्री घेणार असे बोले जात आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंत वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येणार आहे. अशी हिंट घरातील एका सदस्याने दिली आहे. 'बिग बॉस मराठी 6'मधील स्पर्धक सोनाली राऊतने नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मला 100% खात्री आहे की यावेळेस राखी सावंत बिग बॉस मराठीमध्ये येणार... मी तिला एकदा कुठे तरी बोलताना ऐकले होते की, तिला पुन्हा एकदा बिग बॉस मराठीमध्ये जायचं आहे...तिला वाइल्ड कार्ड स्पर्धक, पाहुणी बनून घरात यायला नक्कीच आवडेल... "

राखी सावंत आणि सोनाली राऊत चांगल्या मैत्रिणी आहेत. सोनाली राऊतच्या या वक्तव्यामुळे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये राखी सावंत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चाहते राखी सावंतचा ड्रामा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी ६' ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 6-Rakhi Sawant
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात राशनच्या गोण्यांचा तुटवडा; रोशन अन् ओंकारमध्ये तुफान राडा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com