Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात राशनच्या गोण्यांचा तुटवडा; रोशन अन् ओंकारमध्ये तुफान राडा, पाहा VIDEO

BB Marathi 6 Omkar Raut- Roshan bhajankar : बिग बॉसच्या घरात रोज नवीन वाद पाहायला मिळत आहे. आता टास्क दरम्यान रोशन आणि ओंकारमध्ये भांडण झाले आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
BB Marathi 6 Omkar Raut- Roshan bhajankar
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरात प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये कामावरून वाद होतो.

टास्कदरम्यान रोशन आणि ओंकार यांच्यात भांडण होते.

बिग बॉसच्या घरात राशन टाक्स रंगला आहे.

बिग बॉसच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. घरातील सदस्य रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉसचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात राशनच्या गोण्यांवरून सदस्यांमध्ये अक्षरशः राडा झालेला पाहायला मिळतोय. नुकताच बिग बॉसच्या घरात राशन टास्क रंगला. काल घरात कॅप्टन्सीचे उमेदवार ठरवण्यात आले होते.

बिग बॉसच्या घरात राशन टास्क सुरू असताना. त्याला आक्रमक रुप येते. प्रोमोमध्ये घरातील दोन सदस्य रोशन आणि ओंकार यांच्यात तुफान राडा होतो. दोघे एकमेकांना भिडताना दिसतात. रोशनचे बोलतो की, "पहिली गोणी मी घेतली आहे..." ओंकार बोलतो, "पहिली गोणी मी पकडली होती आधी!" त्यावर रोशन पुन्हा बोलतो, "ए ओंकार माझी सटकली ना तर मी ऐकत नसतो. मी खोटं नाही बोलो. हे माझ्यासाठी 'रोजी-रोटी' आहे. मी उपाशी पण राहायला तयार आहे..."

सध्या बिग बॉसच्या घरातील अनुश्री माने चांगलीच चर्चेत आहे. ती घरातील सदस्यांशी भांडताना दिसत आहे. राकेशनंतर तिचे प्राजक्तासोबत भांडण झाले आहे. काम न करण्यावरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये भांडण होते. ज्यात अनुश्री प्राजक्ताला शिव्या देते. त्यामुळे घराचे वातावरण चांगलेच बिघडते. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण जाणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच घराचा नवा कॅप्टन कोण, पाहूया.

आता टास्क दरम्यान नेमकं गोणी कोणी पहिली पकडली ही येणाऱ्या भागांमध्ये समजेल. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

BB Marathi 6 Omkar Raut- Roshan bhajankar
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com