प्रणित मोरे अन् मालती चहर एकत्र; Bigg Boss 19 मधील भांडण मिटलं, 'तो' VIDEO होतोय व्हायरल

Pranit More - Malti Chahar Reunite Video : 'बिग बॉस 19' चे स्पर्धक प्रणित मोरे आणि मालती चहर एकत्र स्पॉट झाले आहे. त्यांचे बिग बॉसच्या घरातील भांडण मिटले आहे.
Pranit More - Malti Chahar Reunite Video
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19'चे स्पर्धक शो नंतरही कायम एकमेकांना भेटताना दिसतात.

'बिग बॉस 19' च्या घरात असताना प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात भांडण झाले होते.

आता सोशल मीडियावर प्रणित मोरे आणि मालती चहरच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'बिग बॉस 19' शो संपून आता महिना झाला आहे. शो संपल्यावरही स्पर्धक एकमेकांना भेटताना, पार्टी करताना दिसत आहेत. 'बिग बॉस 19'चे विजेतेपद गौरव खन्नाने पटकवले. बिग बॉसच्या घरात अनेक नाती तयार झाली. काही मैत्रीची, काही प्रेमाची. तसेच बिग बॉसच्या घरात गाजलेली जोडी म्हणजे प्रणित मोरे आणि मालती चहर. घरात यांचा खूप खास नातं पाहायला मिळाले. प्रेक्षकांना ते खूप आवडले. मात्र शो च्या शेवटी प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात भांडणे झाली.

'बिग बॉस 19'च्या स्पर्धकांचे दुबईमध्ये गेट-टूगेदर आहे. या निमित्त स्पर्ध पुन्हा एकदा नव्याने भेटले. गौरव खन्ना, प्रणित मोरे, अशनूर कौर, आवेज दरबार हे अनेकदा एकमेकांना भेटताना दिसले. मात्र या दुबईला जाताना विमानतळावर या स्पर्धकांची भेट झाली. तेव्हा अशनूर आणि आवेज प्रणित मोरे-मालती चहरमध्ये मैत्री करून देताना दिसले. याचा खास व्हिडीओ आवेज दरबारने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आवेज आणि अशनूर प्रणितला मालतीशी बोलायला सांगत आहे. आवेज बोलतो की, "प्रणित तू तुझ्या मैत्रिणीशी बोल..." आवेज आणि अशनूर त्यांचा व्हिडीओ बनवत असतात. त्यानंतर प्रणित आणि मालती एकमेकांच्या शेजारी बसतात आणि बोलू लागतात. प्रणित मालतीला HI बोलतो. सर्वजण त्यांची मजा घेताना दिसतात.

प्रणित आणि मालती सुरुवातीला एकमेकांशी बोलताना संकोच करतात. पण नंतर मस्त हसत एकमेकांशी गप्पा मारतात. प्रणित आणि मालतीचे चाहते त्यांच्या या भेटीची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. प्रणित आणि मालतीची मैत्री पुन्हा झाली आहे.

Pranit More - Malti Chahar Reunite Video
Shubh Shravani Serial : "प्रेम असावं तर असं असावं!"; 'शुभ श्रावणी' मालिकेची रिलीज डेट जाहीर, पाहा खास VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com