Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय; कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम

Pune Fraud Case : दुबई-टांझानिया स्क्रॅप व्यापाराच्या नावाखाली पुण्यातील व्यापाऱ्याची ३.७९ कोटींची फसवणूक. खडक पोलिसांनी मास्टरमाईंडला कोलकात्यातून ताब्यात घेतले. देशभरातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याची माहिती समोर.
Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय;  कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील व्यापाऱ्याला कोट्यवधींचा फटका

  • स्क्रॅप मटेरियलच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय रॅकेट

  • खडक पोलिसांची कारवाई; संशयित ताब्यात

  • देशभरातील व्यावसायिक बळी पडल्याची माहिती

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

पुण्यातील नामांकित व्यापाऱ्यांना काही ठगांनी कोट्यवधींना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दुबई व टांझानिया देशांतून कमी दरात 'स्क्रॅप मटेरियल' मिळवून भारतात पुरवठा करण्याचे प्रलोभन दाखवून अनेक व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या लुटारूंचं मोठं रॅकेट पुण्यातील खडक पोलिसांनी उघडकीस आणलं आहे.या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांब्याची भांडी बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल लागतो. डिसेंबर २०२३ मध्ये या व्यापाऱ्याची मुंबईत इंडो आर्फी मेटलस आणि सबपर्ला इंटरनॅशनल LLP चे मालक भूपेंद्रसिंग उर्फ संजय कुमार राघव आणि त्याचा मुलगा पनवीरसिंग राघव याच्याशी झाली. या दोघांनी त्या व्यापाऱ्याला दुबई येथे ऑफिस असून त्यांना लागणाऱ्या स्क्रॅप मटेरियलची कंपनी टांझानियामध्ये असल्याची बतावणी केली.

Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय;  कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम
Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

त्यांच्या भूलथापांना बळी पडून संबंधित फिर्यादी हे त्यांच्यासोबत दुबईला गेले तसेच पुढे टांझानिया येथे गेले. विश्वास संपादन करण्यासाठी या बापलेकांनी त्यांना स्क्रॅप मटेरियलचा तब्बल ७५ टन माल दाखवला.हा माल भारतात निर्यात केला जाईल असं सांगितलं. त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास बसल्यानं संबंधित व्यावसायिकाने त्यांच्याशी करार केला.या व्यवहारापोटी व्यावसायिकाकडून ३ कोटी ७९ लाख ७७ हजार रुपये अबूधाबी येथील बँकेत स्वीकारले गेले.रक्कम भरल्यानंतर व्यावसायिकाला आजपर्यंत कुठलाही कच्चा माल नाही मिळाला. त्यांनी भरलेले पैसेही परत मिळाले नाहीत. याबाबत व्यापाऱ्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय;  कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम
Pune : "माझ्या कामाचे तास संपले" पायलटचा उड्डाण करण्यास नकार, विमान लेट झाल्याने प्रवाशी संतापले

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच खडक पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. तपासादरम्यान राघव हा कोलकाता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खडक पोलिसांच्या एका पथकाने थेट कोलकाता गाठलं आणि राघव याला ताब्यात घेतलं. या बाप लेकांनी मिळून कोलकाता, केरळ, ओडिशा, पंजाबसारख्या राज्यातील अनेक शहरांत अनेकाना फसवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com